Home राजकारण सवनेकरांचे माझ्यावर असलेले प्रेम आशिर्वाद जन्मभर विसरणार नाही…गोपतवाड

सवनेकरांचे माझ्यावर असलेले प्रेम आशिर्वाद जन्मभर विसरणार नाही…गोपतवाड

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/ सवना गाव जन्म भुमी असुन येथील गावकऱ्यांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी मला आशिर्वाद, प्रेम ,माया दिली त्यांच्या उपकाराची जाणीव कदापि विसरणार त्यांच्या आशिर्वादाची शिदोरी कायम माझ्या सोबत असणार असल्याची भावना विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सवना गावचे भूमिपुत्र विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांचा दि. 2 मे रोजी जन्म दिवस या निमित्ताने गावातील युवक, जेष्ठ मंडळींनी मोठ्या उत्साहात जन्म दिवस साजरा केला.
परमेश्वर गोपतवाड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केक भरून शुभेच्छा दिल्या . याचबरोबर शहरासह जिह्यातुन पत्रकार, व्यापारी,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, डॉक्टर , मित्र परिवार यांनी दुरध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. या जन्म दिवसाच्या निमित्ताने लोकराजा न्यूज कार्यालयात आपल्या जन्म दिवसाच्या निमित्ताने परमेश्वर गोपतवाड बोलत होते.
माझ्या सवना गावातील नागरिक तरुण युवकांची माझ्यावर प्रचंड प्रेम निष्ठा आहे.गावाला घेऊन चालतांना कुठेही राजकारण केले नाही त्यामुळे येथील नागरिक सतत माझ्यावर विश्वास ठेवून असतात त्यांच्या विश्वासाला आजपर्यंत तडा जाऊ दिला नाही भविष्यात देखील जाऊ देणार नाही द्वेषाचे राजकारण कधी केले नाही .माझा गाव आणि गावातील सर्व माझे बांधव आहेत हि भावना माझ्या मनात आहे.त्यामुळे माझ्या सवनेकरांचे माझ्यावर असलेले आशिर्वाद प्रेम कदापी विसरणार नाही अशी भावना परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे.
आ. माधवराव पाटील जवळगावकर साहेबांचे आभार
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकप्रिय नेते आ. माधवराव पाटील जवळगावकर साहेबांनी वेळातला वेळ काढून भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल साहेबांचे मनापासून आभार, यासोबतच कैलास माने पाटील, अशोक पाटील यांचे देखील परमेश्वर गोपतवाड यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleहिमायतनगर शहरात रमजान ईद ची जय्यत तयारी…..
Next articleशहरात रमजान ईद चा सण उत्साहात