Home Breaking News पूर्णेतील रेल्वे उड्डाण पूलाचे निकृष्ट पीलर अखेर जमिनोदोस्त

पूर्णेतील रेल्वे उड्डाण पूलाचे निकृष्ट पीलर अखेर जमिनोदोस्त

परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अकोला आणि नांदेड कडे जाणाऱ्या दोन्ही लोहमार्गावर पूर्णा शहरात रेल्वे उड्डाण पूलासाठीच्या पिल्लरचे बांधकाम चालू आहे. सदर उड्डाण पूल बांधकामाचे टेंडर आंध्रप्रदेशातील एका रेल्वे गुत्तेदाराने घेतले आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ९ पिल्लर बांधण्यात आले होते. त्या पिल्लरचे बांधकाम हे रेल्वे खात्याच्या बांधकाम गुण नियंत्रक अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सदर बांधकाम अंदाजपत्रकाला फाटा देत निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी गुत्तेदारास सदरील पिल्लर पाडून अंदाजपत्रकाप्रमाणे नव्याने बांधण्याचे आदेश दिल्या गेले. त्यावरुन गुत्तेदाराकडून हे निकृष्ट दर्जाचे पिल्लर पाडण्याचे काम सध्या जलदगतीने चालू आहे. चैन पोकलॅन यंत्राद्वारे पिल्लर जमीनोदोस्त केले जात आहेत. यामुळे गुत्तेदाराची लक्षावधी रुपये रक्कम वाया गेली आहे. तसेच सबंधित उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी अडसर ठरणारे व रस्ता रुंदीकरणाकरीता काही फुट जागा लागत असल्यामुळे उड्डाण पुलाच्या शेजारील घराचा किंवा बांधकाम केलेल्या दुकानाचा काही फूट अंतर भाग पाडण्यात येवून जागा रेल्वे खाते आरक्षित करुन घरमालक प्लाॅट मालक यांना मोबदला देणार असल्याचे समजते.

Previous articleपशूधन अधिकारी डॉ कवठेकर यांचा सेवानिवृत्त समारंभ थाटात संपन्न!
Next articleभारतीय स्टेट बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा !