Home Breaking News स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बोरगडी तांडा नं -२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बोरगडी तांडा नं -२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांनी तिरंगा झेंड्याचे केले घरोघरी वाटप …

हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा- मुख्याध्यापक दासरवाड सर

भूमीराजा न्यूज
प्रतिनिधी/ कृष्णा राठोड
९१४५०४३३८१

हिमायतनगर:-तालुक्यातील
बोरगडी तांडा नं २ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापका सह , शिक्षकांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आज तिरंगा झेंड्याचे घरोघरी वाटप केले आहे. बोरगडी तांडा येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या स्वखर्चातून तिरंगा झेंड्याची खरेदी करून त्याने बोरगडी तांडा येथील गावकऱ्यांना आज प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हर घर तिरंगा लावण्या साठीचा चा संदेश दिला आहे. तसेच तिरंगा लावताना घ्यावयाची काळजी, तिरंगा चे नियम देखील मुख्याध्यापक दासरवाड सरांनी गावकऱ्यांना सांगितले आहे.
व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत गावकऱ्यांनी आपल्या घरावर तिरंगा लावून लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावे असे प्रोत्साहन देखील येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांनी गावकर्‍यांना दिले.लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी व हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकाने स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी लोकांच्या मनात राष्ट्र भावना निर्माण व्हावी,हा उपक्रम गावातील प्रत्येकाने राबवावा.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक दासरवाड, सहशिक्षक चव्हाण सर, केंद्रे सर, पोलीस पाटील प्रेम राठोड, बोरगडी तांडा नं-२येथील नाईक अमरसींग लिंबाजी राठोड, कारभारी रामराव गुणाजी राठोड, माजी सरपंच शामराव धेना राठोड, ज्येष्ठ नागरिक फकीरा देवला राठोड, रोहिदास जाधव (ग्रा.स). विठ्ठल आडे( ग्राम. स )देवराव फकीरा जाधव, यासह अंगणवाडी सेविका, कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य रॅली
Next articleशहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ