Home Breaking News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सनशाईन स्टार किड्स मार्फत मेडिकल व...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सनशाईन स्टार किड्स मार्फत मेडिकल व हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

सदर कॅम्प साठी लोकमान्य हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. समीर अहिरे व कुमावत क्लिनिकचे संचालक डॉ. रोशन कुमावत हे मार्गदर्शक म्हणून लाभलेत.

कॅम्प ला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉक्टर समीर अहिरे यांनी मार्गदर्शन करत असताना निरोगी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले.

डॉक्टर रोशन कुमावत यांनी आहाराचे महत्व अधोरेखित केले. पावसाळ्यात आपण काय काय काळजी घ्यायला हवी, व पावसाळ्यातली आहार यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

चेकअप कॅम्प मध्ये डॉक्टर कुमावत यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला चेक करून प्रिस्क्रीप्शन्स दिलीत.

कॅम्प साठी सौम्या मेडिकल, शिवम पॅथॉलॉजिकल लॅब यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत बडगुजर यांनी केले. व आभार प्रदर्शन सनशाइन स्टार किड्स प्री स्कूलच्या संचालिका सौ स्वाती बडगुजर यांनी केले.

Previous articleराजकारणातील मराठवाड्याने अनेक नेते गमावले!
Next articleपक्या रस्त्यासहित स्मशानभूमीत शेडसाठी निधी उपलब्ध करून द्या..