Home Breaking News सिन्नर तालुक्यातील पुरग्रस्तांना सांगली, कोल्हापुरच्या धर्तीवर मदत

सिन्नर तालुक्यातील पुरग्रस्तांना सांगली, कोल्हापुरच्या धर्तीवर मदत

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

समृद्धी महामार्गचे चुकीचे नियोजन कारण ठरल्याची शेतकऱ्याची व्यथा

हेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

गुरुवारी सिन्नर शहर व तालुक्यातील 76 गावांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अवघ्या दोन तासात 165 मिलिमीटर इत का विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे घरांसह दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व नुकसानींचे पंचनामे सोमवार पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश दिले गेले असून नुकसानग्रस्तांना सांगली, कोल्हापुर व कोकण च्या धर्तीवर मदत केली जाईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करताना सांगितले.
महाजन यांनी सिन्नर शहरातील काही भागांना भेटी देवु न झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अचानक पुर आल्याने घरे, भिंती व घरसामान वाहून गेले. नागरिकांना त्याच्या कुठल्याही मालमत्तेला वाचविण्याची संधी मिळाली नाही. शहरातील व्यापारी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणा त पाणी शिरल्याने व्यापाऱ्याचा माल मोठ्या प्रमाणात ओला झाला आहे. घटना घड़ल्यापासून प्रशासनामार्फ़त बचाव व मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरुपाची मदत म्हणून अन्न, धान्य, तेल, चहा, दुध, यांचे किट देण्याबरोबरच मंगल कार्यालये, व शाळामधुन नारिकाकांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली आहे.
या घटनेला समृद्धी महामार्गही कारण ठरल्याची व्यथा शेतकऱ्यानी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. ” समृद्धी महामार्ग विकासाचा मार्ग आहे, पण नियोजन चूकल्याने पाण्याचा निचरा होण्या ची योग्य व्यवस्था झाली नाही, ” अशी कबुली महाजन यांनी शनिवारी दिली.
समृद्धी महामार्गच्या प्रश्नावर गणेशोत्सवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन महाजन यांनी शेतकऱ्याना दिले.

Previous articleहर्ष उल्हासामध्ये जेष्ठ गौराईचे आगमन.
Next article🌹” मित्र “🌹