Home कृषीजागर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे निवेदना द्वारे केली नुकसान भरपाईची मागणी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे निवेदना द्वारे केली नुकसान भरपाईची मागणी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

प्रहार शेतकरी संघटना चांदवड तालुका तथा नाशिक जिल्ह्याच्या वतीने पिकविमाप्रश्नी कंपनीआणि जिल्हा कृषीअधीक्षक कार्यालयात चौकशी केली असता सगळ्या शेतकऱयांना पीकविमा मिळालेला नाही. आणि जो मिळाला आहे तो नुकसाणीस अनुसरून नाहीये हे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालायाला निदर्शनास आणून दिले. शेतकरी हिस्सा आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने भरलेला हिस्सा फक्त परत दिला जर शेतकर्याचे 100 %नुकसानीचे पंचनामे आहेत तर त्यांना त्या हिशेबाने परतावा मिळाला पाहिजे. पण त्याला फक्त 5 %परतावा देताय ही बाब गँभीर आहे.  शेतकऱ्याच्या विमाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार चालू असल्याची खात्री असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलून दाखविले जात आहे , वेळप्रसंगी प्रहार शेतकरी संघटना चांदवड तालुका व नाशिक जिल्ह्याच्या वतीने पीकविमा प्रश्नी एचडी एफसी इरगो कंपनी विरूद्ध शेतकरी एल्गार करू.यांच्या गाळामुळाशी गेल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही. असा सूचक इशारा प्रहारच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर ,जिल्हा सरचिटणीस समाधान बागल,तालुका सम्पर्क प्रमुख रेवन गांगुर्डे ,शहरप्रमुख श्याम गोसावी ,रावसाहेब गांगुर्डे ,प्रताप गांगुर्डे, हेमंत शिंदे आदींनी दिला

 

Previous articleआज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन.
Next articleडॉ. अशोक शिरसाट राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित : अकोला