Home Breaking News क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय , देगांव येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब...

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय , देगांव येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती संपन्न

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी बाळापुर

(देगांव / १२ जानेवारी ) – स्थानिक अकोला जिल्हयातील देगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्व. वाचनालयात १२ जानेवारी २०२३ रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला . याप्रसंगी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या दिव्य प्रतिमांना मान्यवरांनी हारार्पण करून पूजन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अश्वजित शिरसाट होते. बाळापूर पं .स. सभापती शारदाताई रामकृष्ण सोनटक्के, सरपंचपती राजेश सरदार, उपसरपंच पुष्पाताई विष्णू भाकरे, पत्रकार तथा कवयित्री शितलताई शेगोकार , सदस्य प्रदीप तायडे आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी विचार व्यक्त केले . तसेच ज्येष्ठ नागरिक क्षीरसागर अंभोरे, साहित्यिक मोहन अवचार, बी. के. इंगळे, आनंद अंभोरे, अजय सुरवाडे, आकाश इंगळे, गजानन नाटकर, खुशी तायडे, आकांशा खंडारे, कोमल गाडगे आदिंची समयोचित भाषणे झालीत. याप्रसंगी वैभव रमेश इंगळे या विद्यार्थ्याला नुकताच बीएएमएस ला प्रवेश मिळाला , त्या प्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यांत आले.तसेच संगीता अंभोरे, आशाबाई तायडे सह आदी गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय डॉ. अशोक शिरसाट यांनी करून दिला.सुत्रसंचालनाची अभ्यासपूर्ण धूरा नागसेन अंभोरे यांनी सांभाळली. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसिध्दी प्रमुख सुमेध अंभोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Previous articleकारला येथे राजा भगीरथ जयंती निमित्त ह. भ.प.नरसिंग महाराज यांची किर्तन सोहळा…
Next articleकारला येथील शेतकर्यांने वाचविले हरणीचे प्राण…