Home Breaking News नाशिक मधील अशोकस्तंभा जवळ 61फूट उंच,22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा

नाशिक मधील अशोकस्तंभा जवळ 61फूट उंच,22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा

जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून मान्यता मिळावी या करीता ” वंडर बुक ऑफ़ रेकॉर्ड ” कडे मागणी नोंदणी पल

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारला जात असलेला 61 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यंदाच्या शिवजयंतीचे खास आकर्षण असेल.पुतळ्याची उभारणी 60 वर्ष जुन्या अशोक स्तंभ मित्र मंडळाकडून केली जात असून, हे अशोकस्तंभ मित्र मंडळ गणेत्सोसव, स्वातंत्रतादिन यांसारख्या अनेक उत्सवानिमित्त अनोखे देखावे सादर करण्या बाबत सुप्रसिद्ध आहे.
या शिव पुतळ्याची रुंदी 22फूट तर वजन तब्बल 3000 किलो आहे. सलग बारा दिवसांच्या अतोनात मेहनतीतून हा पुतळा घडविला जात आहे. तीन दिवस 3 क्रेनच्या मदतीने 3 भागात विभागलेला हा पुतळा उभा राहणार आहे.
दिड महिन्यांपूर्वी पुतळ्याची घडवनूक त्रबंकेश्वर रस्त्यावरील ए च. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरु केली होती. प्रत्येक्षात पुतळा पुर्ण होऊन केवल 10 % रंगकाम बाकी असतांना शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत पहिल्या पुतळ्याची हानी झाली होती.विशेष म्हणजे यानंतर अवघ्या 12 दिवसात या मूर्तीकारांनी हा विलोभनिय पुतळा घडविला.
अशोकस्तंभ मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांना 10 वर्षापासुन अशी भव्य दिव्य मुर्ती साकारायची इच्छा होती, ते स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. यंदाच्या 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी नाशिककरांसाठी हा पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरणार हे नक्की.

Previous articleपवना येथे अखंड हरिनाम सप्ताह.
Next articleअहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर झालेच पाहिजे ” या मागणी करीता नगर नामांतर कृती समितीचा सोमवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा