Home Breaking News गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सवना ज. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सवना ज. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – १३ मार्च २०२३

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षीही चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पवनपुत्र हनुमंत रायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमत भागवत कथा सोहळा, हरिपाठ, हरि किर्तन, हरीजागर आदी कार्यक्रमाचे आयोजन सवना ज. नगरीतील भाविक भक्त, माता भगिनी, भारुडी भजनी मंडळ, संगित भजनी मंडळ, महिला भजणी मंडळ या सर्वांच्या ह्रदय पुर्वक स्नेहातुन हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. यासाठी गावातील सर्व भाविक भक्त, माता भगिनी, अधिकारी, कर्मचारी यांनीही भरभरुन मदत दिली आहे.
दिनांक 22 मार्च ते 28 मार्च दररोज काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमत भागवत कथा सोहळा, हरिपाठ हरि किर्तन आणि हरीजागर असे भरभरुन कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 29 मार्च रोजी ग्रंथदिंडी प्रदशिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याचे किर्तन होईल. लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सवना ज. परीसरारातील तालुक्यातील भाविक भक्त यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सवना ग्रामस्थांनी केले आहे.

Previous articleश्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर जयंती नियोजन जोरात
Next articleछ.शिवरायांची आरती करुन देव करु नका त्यांचे विचारांनी जनजागरण करा_