Home Breaking News श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सवाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व महाराष्ट्राचे...

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सवाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार

जन्मोत्सव समिती अध्यक्षा तथा ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली माई यांची माहिती

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

शनिवार दि.18 मार्च रोजी सायं.5 : 00 वाजता तुळजा भवानी मंदिर मैदान, समर्थ अध्यापक कॉलेज शेजारी, जाधव संकुल, अशोक नगर, सातपूर नाशिक येथे हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.
या जन्मोत्सवा साठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री मा. दादासाहेब भुसे, प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. अनिलभाऊ चैाधरी, ओबीसी नेते मा. प्रकाश आण्णा शेंडगे, माजी आमदार हरिदासजी भदे, नाशिक चे खासदार मा. हेमंत आप्पा गोडसे, सिडको च्या आमदार मा. सीमाताई हिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. भाऊलाल तांबडे, माजी शिवसेना नगरसेवि का मा. पूनमताई मोगरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याची माहिती जन्मोत्सव सोहळया च्या अध्यक्षा तसेच ओबीसी उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षा सोनालीमाई  यांनी दिली आहे.
या जन्मोत्सवा साठी नाशिक शहर व जिल्हयांतील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे समाजातील मान्यवर आ धिकारी कर्मचारी,समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांना सन्माननीय उपस्थिती म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे.
या मल्हारराव होळकर जन्मोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे होळकरशाहीचे गाढे अभ्यासक व वक्ते प्रा. यशपाल भिंगे सर यांचे व्याख्यान व होळकरशाहीचे शस्र संग्राहक़ व प्रदर्शक श्री. आनंद ठाकूर यांचे शस्र प्रदर्शन व प्रात्यशिक सादरीकरण हे असणार आहे.
या जन्मोत्सवासाठी दिगंबर भाऊ मोगरे ( उपजिल्हा प्रमुख शिवसेना ) व समाधान भाऊ बागल ( जिल्हा चिटणीस प्रहार नाशिक ) यांच्या नेतृत्वाखाली जन्मोत्सव सेवा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात उपाध्यक्ष व मल्हार महासंघ जिल्हाध्यक्ष आन्नासाहेब सापनर, स्वागताध्यक्ष व रा. स. प. युवक नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथभाऊ शिंदे, कार्यध्यक्ष व समाजसेवक राजाभाऊ बदाड, सचिव व समाज सेवक विजय चितळकर पाटील, प्रसिद्धी प्रमुख व अध्यक्ष – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ, सह सचिव व युवा जिल्हाध्यक्ष मल्हार महासंघ वैभव रोकडे, खजिनदार व भाजपा भ. वि. आ. शहराध्यक्ष बाबुराव हिंगे पाटील, सल्लागार व शहर प्रमुख प्रहार श्याम गोसावी, सल्लागार व समाजसेवक सुरेश महाराज देवकर, समाज सेवक देवराम रोकडे, समाज सेवक भु षण जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
जन्मोत्सव सोहळा अध्यक्षा तथा ओबीसी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली माई  यांनी व समिति पदाधिकारीनी मल्हारराव होळकर जन्मोत्सवा साठी सर्व होळकर प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Previous articleराज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या खारपाण पट्ट्यातील पाणी पुरवठा योजनेला स्थगिती विरोधात उपोषण
Next articleकृषि सहाय्यक संघटना बेमुदत संपात सहभागी!