Home राजकारण भाजप हा सर्वांना सोबत घेउन चालनारा पक्ष आहे – आमदार रणधीर सावरकर.

भाजप हा सर्वांना सोबत घेउन चालनारा पक्ष आहे – आमदार रणधीर सावरकर.

श्री जागेश्वर मंदीर सरक्षण भिंती साठी 2 कोटी रूपायाचा निधी खासदार संजय धोत्रे यांनी दिला. यामूळे शिवभक्तात आनंदाचे वातावरण

आमदारांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

डाँ चाँद जिल्हा प्रतिनिधी अकोला

त्या ७९ गावांना पाणी मिळवुन देण्याकरीता सर्व अडचणींचा निपटारा करून पाणी उपलब्ध करुन देऊ.
वाडेगाव प्रतिनिधी,
दि ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता नविन ग्रा पं पटांगणात येथे भारतीय जनता पार्टीचे बुथ अभियान तसेच शेकडो पुरुष व महिलांचा भाजपा पक्षामध्ये पक्ष प्रवेश असा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. तसेच स्थानिक लिंबुउत्पादक शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायटी येथे .जमा होऊन लिम्बु उत्पादकाच्या वतीने सन २२ मध्ये अतीवृष्टी झालेल्या लिम्बु उत्पादकांना सरकार दरबारी ज्ञाय मिळवुन दिल्या बद्दल थेतकरी प्रकाश कंडारकर यांच्या नेतृत्वात आमदार सावरकरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहारार्पण करून स्वागत करून केले आभार व्यक्त.
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाची बांधणी व मजबुतीकरण करण्याच्या हेतुने बुथ अभियान व इच्छुक पुरुष व महिलांचे आमदार सावरकरांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच यावेळी सावरकरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या . तसेच गावातील नागरीकांसोबत संवाद साधुन गावातील सुख सोई समस्यांबाबत चर्चा करून शासन निधीतुन जे काही विकास कामे करता येतील ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी मंचकावर उपस्थित गावाच्या प्रथम नागरीक सरपंच रूपाली अंमुश शहाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार | चिंचोळकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रणधिरभाऊ सावरकर, प्रमुख उपस्थिती अनुपभाऊ संजय धोत्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पांडे गुरूजी, माजी आमदार बळीराम सिरस्कार, अकोला महापौर जयंतराव मसने,भाजपा प्रदेश सदस्य तेजराव थोरात, शंकरराव वाकोडे, माधव मानकर भाजपा जिल्हा सररचिटणीस, मनोहरराव राहणे माजी जिल्हा उपाध्यक्ष, जीवनगीर गोस्वावी, अमोल साबळे बाळापुर तालुका अध्यक्ष, रमण जैन पातुर ता. अध्यक्ष, रमेशआप्पा खोबरे सरचिटणीस अकोला, गणेशराव तायडे उपाध्यक्ष जिल्हा अकोला, अंबादासजी उमाळे अध्यक्ष अकोला तालुका, अनंतराव बगाडे उपसचिव अकोला तालुका , प्रशांत मानकर माजी उपसभापती बाळापुर, पंकज सहगल, राम नारगुडे, शिवदास मानकर, सुनिल मानकर, सुनिल देशपांडे, गजानन मानकर, सचिन बेलुरकर, शिवा कळसकार, शाम पोहरे, सुशील मानकर, अमित रामरोहीया, ग्रा पं सदस्या अर्चणा मसने, छाया मानकर, तसेच गावातील प्रतिष्ठत नागरीक तसेच सर्व पत्रकार मंडळी
व भाजपा चे कार्यकर्त मोठया संख्येने उपस्थित होते.
मनसे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश वा.मसने व ग्रा पं सदस्या अर्चणा प्रकाश मसने यांच्या नेतृत्वात अंदाजे ५० पुरष व महिला यांनी भाजपा पक्षात पक्ष प्रवेश केला. तसेच मौजा धनेगाव येथील युवकांनी पक्ष प्रवेश केला.
कार्यक्रमाचे संचालन गणेश कंडारकर यांनी तर प्रास्ताविक प्रशांत मानकर व आभार महेन्द्र पाटीलखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासठी प्रशांत मानकर व मित्र मंडळ यानी केले.

आज अनेकांनी पक्षात प्रवेश घेतले त्या सर्व तरून मित्र महिला आघाडी यांचे स्वागत करतो आणी त्यांना बुथ समितीमध्ये घेऊन ते ज्या वार्डात राहतात त्या वार्डाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या कडे सोपवा आणी काही अडचणी आल्यास त्यांना सहकार्य करा.लिम्बु उत्पादक शेतकरी तथा इतर शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीसाठी मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील.
बाळापुर तालुक्यातील काही लोकांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली की ७९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेवर स्टे आणला आहे. मला एवढेच सांगायचे आहे स्टे जो आणला आहे तो वान धरणातील पाणी घेण्यासाठी आणला आहे. वान धरणातील ७७ टक्के पाणी आरक्षित आहे आणी आपण जर बाळापुर तालुक्यासाठी पाणी घेतले तर ते आरक्षण ८५ टक्क्यांवर चालले होते. आणी त्याला तेल्हारा तालुक्यातील नागरीकांचा विरोध आहे.आणी आपण जर कवठा बॅरेजमधुन पाणी घेतले असते तर फक्त २३ कि मि पाईपलाईन टाकुन पाणी घेता आले असते. हे बाजुला ठेऊन आपण ११० कि मि वान धरणाकडे गेलो मला हेच कळत नाही असे का केले ? आणी कशासाठी केले ? .एवढे निश्चित आहे स्टे मिळवण्यात जरी भाजपा चे प्रकाशभाऊ भारसाकळे होते. तरी ७९ गावांना पाणी मिळवुन देण्याकरीता आपण सर्व एकत्र राहु आणी योजना पुर्ण करू राजकारणासाठी विरोध आणी विरोधासाठी राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही तिथल्या सत्ताधारी आमदाराला विरोध आहे म्हणुन ७९ गावांना पाणी द्यायचे नाही असे होणार नाही. त्या सर्व ७९ गावांना पाणी तर भेटलेच पाहिजे आपण कवठा बॅरेज मधुन पाण्याची व्यवस्था करू आणी सर्व अडचणींचा निपटारा करू आणी ७९ गावांना पाणी पोहचेल असे आपण सर्वांना मी अश्वासन देतो.

रणधीरभाऊ सावरकर
भाजपा जिल्हा अध्यक्ष ,आमदार अकोला पर्व.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीच्या पॅनलचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले…
Next articleशेगाव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजपयोगी कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार व सन्मान