Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर जयंती समारंभासाठी महाराष्ट्र शासनाचा 50लक्ष निधी मंजूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर जयंती समारंभासाठी महाराष्ट्र शासनाचा 50लक्ष निधी मंजूर

आमदार प्रा. राम शिंदे व आमदार गोपीचंद पड़ळकर यांच्या मागणीला यश

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 898331907031

तमाम हिंदू धर्मीयांच्या श्रद्धधास्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी प्रा. राम शिंदे व आमदार गोपीचंद पड़ळकर यांनी मागणी केलेल्या 50 लाख रूपयांच्या निधिला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.31 मे या अहिल्यादेवीच्या जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे हा समारंभ साजरा होणार आहे.
कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार तथा राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज प्रा. राम शिंदे व आमदार गोपीचंद पड़ळकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना मधून निधी द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. महाराष्ट्र शासनाने ही मागणी मान्य केली असून नियोजन विभागाने अहमदनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांना या निधीची तरतुद करण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशानुसार जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गतच्या ‘ इतर जिल्हा योजनेतून 50 लाख रुपये इतका निधी देण्यास मान्यता दिली आहे. यंदा 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती या शासकीय निधीतून खुप मोठ्या जल्लोषाने साजरी होणार आहे.
शासनाच्या या निर्णया मुळे समाज बांधवा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, व सर्वांच्या नजरा 31 मे या अहिल्यादेवीच्या जन्मदिनाच्या चोंडी येथील कार्यक्रमा कडे लागल्या आहेत.

Previous article
Next articleमुख्यमंत्री आदित्यनाथ योगींवर हत्येचा गुन्हा दाखल करा – रेखाताई ठाकूर