Home Breaking News कृषि उत्पन्न बाजार समिती नफ्यात आणणाऱ्या सहकार पॅनल च्या पाठीशी उभे रहा!...

कृषि उत्पन्न बाजार समिती नफ्यात आणणाऱ्या सहकार पॅनल च्या पाठीशी उभे रहा! श्रीकृष्ण मोरखडे! वाडेगाव

शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी
बाळापुर तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती सन २००३ पर्यत सतत तोटयात होती ही संस्था सन २००३ नंतर शेतकरी सहकार पॅनल च्या हातात कृषि उत्पन्न बाजार समिती गेल्यानंतर आजपर्यंत शेतकऱ्यांची हित जोपासना करणाऱ्या सहकार पॅनल हातात आहे व या लोकांनी सदर संस्थेचा कारभार व्यवस्थित सांभाळून संस्था नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आजच्या घडीला संस्था नफ्यात असल्याचे प्रतिपादन भाजपा किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे यांनी केले असून होऊ घातलेल्या निवडणुकीत देखील मतदारांनी शेतकरी हित जोपासना करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे रहावे असे मत व्यक्त केले
ते निंबा गावात निवडणूक प्रचारादरम्यान आयोजित सभेत बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की अकोला जिल्हा परिषद मध्ये वंचित ची सत्ता आहे त्यांनी जिल्ह्यात विकासकामे करताना काय दिवे लावले आहेत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासना करणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीचे दिवाळे निघू म्हणून जातपात, पक्ष ह्या गोष्टीला महत्त्व न देणाऱ्या सर्वपक्षीय शेतकरी सहकार पॅनल सर्व उमेदवारांना मतदान करून शेतकऱ्याची संस्था अबाधित ठेवा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले यावेळी पॅनल प्रमुख विद्यमान सभापती सेवकराम ताथोड,जिल्हा बँकेचे संचालक राजेश राऊत, संदीप पाटील, रामभाऊ काळे,बंडु पोहरे,रमेश ठाकरे, कैलास घोंगे,ज्ञानेश्वर माळी,विठ्ठल माळी,संजय कराळे, राजेश्वर वैराळे, राजेश नळकांडे, गोपाल उगले, गजानन वझीरे,रवीद्र मुरुमकार, गणेश तायडे,किशोर कुचके, विजय फुकट,प्रशांत पोहरे, दिलीप पटोकार, अजय कराळे,प्रमोद देशमुख, सरपंच सोनोने,आकाश वाकडे,दिनेश तायडे,नंदकुमार तायडे,अजिंक्य राऊत, कैलास विरोकार,रमेश देशमुख, विपुल घोगरे, प्रशांत मानकर,अनंतराव तायडे आदीसह बहुसंख्य गणमान्य नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सहकारी सोसायटी संचालक उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये गोडाऊन, लिलावगृह बांधकाम आणि आधुनिक वजन काटे खरेदी केले तसेच संस्था नफ्यात आणण्याचे काम केले हे करताना संस्थेत पक्षीय राजकारण येऊ दिले नाही
सेवकराम ताथोड ( सभापती कृ उ बाजार समिती बाळापुर)

Previous articleहंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांची लग्नं रखडली
Next articleधनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.