Home Breaking News खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत...

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत.

तालुका कृषि अधिकारी यांचे आव्हान.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 26 फेब्रुवारी 2025

:- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रति हेक्टर 5 हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येत आहे. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आपले आधार संमती वसामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषि सहाय्यकांकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषिअधिकारी/ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, तसेच

ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिकपहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबाराउताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप 2023 कापूस, सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व कापूस/सोयाबीनउत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असलेबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या सातबाराउताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनीआपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. खरीप 2023 कापूस / सोयाबीनउत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleकु.निकिता देवचे हिने मिळवले संत गाडगे बाबा अमरावती विभागा मधुन सर्वाधिक 6 सुवर्णपदके
Next article*II मराठी राजभाषा गौरव दिन’ II*