Home Breaking News भुगर्भातील पाणीपातळी खाली गेल्याने विहीरीने गाठला तळ.

भुगर्भातील पाणीपातळी खाली गेल्याने विहीरीने गाठला तळ.

👉 *झळा पाणीटंचाईच्या*

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 मार्च 2025

 

हिमायतनगर तालुक्यातील भुगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतक-यांच्या विहिरी कोरडया पडल्याचे वास्तव चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यात दिसत आहे.

पावसाळ्यातील पडणारे पावसाचे पाणी हे निरंतर पडत नसल्याने जमिनीत पावसाचे पाणी मुरत नसल्याचे जाणकार शेतक-यांनी म्हटले आहे.

धो..धो..पडणारा पाऊस कमी वेळात कालावधीत पडुन जमिनीवरुन ताबडतोब पासुन जात आहे. त्यांमुळे यावर्षी उन्हाळयात भिषण पाणी टंचाईला शेतक-यांना यावर्षी सामोरे जावे लागत आहे..

ज्वारी, तिळ, भाजीपाला, फळपिके, फुलपिके यांसारखी पिके पाण्याअभावी करपुण जात आहेत.

हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा करणारी नळयोजना अपुर्ण असल्याने शहरात प्रचंड पाणीटंचाई होत आहे.

ग्रामीण भागातील विंधन विहिरी, कुपनलिकेचे पाणी झाले आहेत. पाणीटंचाई आराखडा बैठकीत घेतलेले निर्णय लवकर अंमलांत आणुन नागरीकांचा पाणी प्रश्न ताबडतोब सोडवावा अशी मागणी होत आहे.

Previous articleपंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ संपन्न.
Next articleभोईमुग ( शेंगदाणे ) बियाणे पेरलेले उगवलेच नाही.