हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
कागदावर बोगस वसतिगृहे दाखवून धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटणारे हे महाभाग कोण? श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने योजना सुरू होते. आणि भ्रष्टाचाराची कुरण बनते?
खुद्द राज्याचे इतर बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याच जिल्ह्यात या योजनेतून कोट्यवधी रुपये उकळले गेलेत. हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. मंत्र्यांच्या डोळ्यादेखत योजनेचा पैसा लाटला जात असताना मंत्री आणि महायुती सरकार झोपा काढत होतं?
ना वसतिगृह आहे.. ना विद्यार्थी.. तरीही अधिकारी फायलींवर सह्या करतात. ही डोळेझाक आहे की मलिदा लाटण्याचा प्रकार? फायलींवर वसतिगृह दाखवून त्यावर सह्या करणारे हे अधिकारी कोण आहेत? सरकारने याची गंभीर दखल घेत प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
धनगरसमाज श्रीमंतराजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना
समाधान बागल..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य



