*राहणीमान भत्त्यासाठी डोळ्यात पाणी, परिवारावर उपासमारीची वेळ*
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674
जलंब ग्रामपंचायतीच्या अन्यायाने तुटलेली आशा – स्व. शिवहरी देवचे यांच्या कुटुंबीयांचे तीन वर्षांचे हंबरडे आणि प्रशासनाकडून मिळणारे केवळ आश्वासनच
जलंब ग्रामपंचायतमध्ये लिपिक पदावर कर्तव्य बजावणारे स्व. शिवहरी देवचे यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात अंधार पसरला. १८ सप्टेंबर २०२२ रोजी आपले कर्तव्य बजावत असतांना ग्रामपंचायत आवारात संध्याकाळी त्याचा ब्रेन हेमरेंज झाला नंतर उपचारा दरम्यान अकोला येथे त्याचा मुत्यु झाला व परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला; तेव्हापासून कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात आहे. रोज पार पडणाऱ्या गरजा, मुलांचे शिक्षण, आरोग्य या संघर्षमय वाटचालीसाठी हक्काचा महागाई भत्ता मिळावा अशी तीन वर्षांची तगमग संघर्षात शेवटी आज आता संघर्षात बदलली.
जलंब ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे मृत ग्रामपंचायत लिपीकाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तीन-चार वर्षांपासून राहणीमान भत्ता पुर्ण मिळाला नाही.
हे कुटुंब आपले हक्काचे पैसे मिळावेत, म्हणून प्रत्येक दरवाज्यावर न्यायासाठी धाव घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती पासून ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे सतत विनंती करून सुध्दा कुणीही दाद देत नाही.मुत्यु झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्निचे म्हणणे आहे की, “आमच्या घरात अन्नधान्याची मुलांच्या शिक्षणाची औषधाचीही सोय नाही. उपासमारीची वेळ आली आहे तरी ग्रामपंचायतने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले नाही.
१-०८-१९९६ ते १५-०९-२०२२ या काळात संबंधित कर्मचाऱ्याने सेवा दिली. त्यांच्या निधनानंतर त्याच वर्षात घरातील सासु सासरे यांचा सुधा त्याच वर्षा मधे मुत्यु झाला घरात कुनी करता पुरूष नसल्याने कुटुंबाच्या पोटाची खळगी कशी भरणार असा प्रश्न उभा राहिला आहे. अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे.
२००७ ते २०२२ या काळात ग्रामपंचायत कर्मचारी यांना महागाई भत्ता मिळायला हवा होता पण तो मिळाला नाही आता कर्मचारी यांचे निधन झाले तरीही हा महागाई भत्ता पूर्णत मिळाला नाही
“एक लाख तीस हजार चारशे सदुसष्ट” एवढा महागाई भत्ता ग्रामपंचायत कडे बाकी आहे जेव्हा जेव्हा मुत्य कर्मचाऱ्यांची पत्नी त्यांचा हक्काचा पैसा मागण्या करीता जायची तेव्हा तेव्हा वसुली नाही असे सांगुन त्यांना टाळुन घरी पाठवल्या होते खरतर 2022 पासुन आजपर्यंत वसुली झालीच नसेल का हा मोठा प्रश्न पडतो …आजकाल डीजीटल मिडीया असल्या मुळे ग्रामपंचायत मधे येनारा प्रत्येक निधी हा सगळी जनता पाहु शक्तो असे असतांना सुध्दा त्याचा त्यांच्याच पतीच्या पैसा साठी छळ केल्या जात आहे
ग्रामीण भागात विशेषतः गोरगरीब कुटुंबासाठी सरकारने गरीब-कल्याणसाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत हा कुटुंब कायद्याने मिळणारा पैसे मागत आहे.
अनेक पत्र व तक्रारी शासनाच्या विविध पोर्टल, स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवल्या. तरीही अद्याप कुठल्याही अधिकाऱ्याकडून मदतीचा प्रतिसाद मिळालेला नाही.कुटुंबाने शासन व ग्रामपंचायत यंत्रणेला आवाहन केले आहे – “किमान आमच्या पोटासाठी भत्ता मिळावा.”
२७-६-२०२५ ला परत एकवेळेस
ऑनलाइन तक्रार उप.मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना दिली असता त्यांना ग्रामसेवक सुभाष काळे यांनी स्पष्ट लेखी उत्तर दिले की , “इतर तीन कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे त्यांना राहणीमान भत्ता अदा करण्यात आला, त्यामुळे स्व. शिवहरी देवचे यांच्या कुटुंबाचा राहणीमान भत्ता प्रलंबित राहिला.” यातील वस्तुस्थिती अशी आहे की, त्या तिघांपैकी एक कर्मचारी तब्बल दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाला, तर उर्वरित दोन २०२५ मध्ये सेवामुक्त झाले. अशा परिस्थितीत, २०२२ मध्ये मुत्यु झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा महागाई भत्ता थांबवणे हे अन्यायकारक नाकारता येणार नाही असा दुजाभाव आहे.
ग्रामपंचायतीने अन्य निवृत्त कर्मचाऱ्यांना भत्त्याचा फायदा दिला असुन, या कुटुंबाचा हक्काचा महागाई व राहणीमान भत्ता नाकारत त्यांच्या आयुष्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. हा प्रकार केवळ नियमभंगच नव्हे, तर मानवी संवेदनाही हरवलेला आहे
उमेद, संघर्ष, आता हताशपणा… अनुकंपा च्या नियुक्तीसाठी २०२२ पासून मुत्य कर्मचाऱ्यांची पत्नी वेळो वेळी अर्ज करता आहे, पण ग्रामपंचायतीने रिक्त जागेची पूर्तता केली आणि रिटायर कर्मचारी यांच्या जागी दुसरे कर्मचारी भरती केले परतू मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदसस्याला नियुक्ती साठी प्राधान्य दिले नाही .त्यांच्या अर्जाचे उत्तरही दिले नाही, “न्यायही नाही — फक्त व्याकुळ नजर आणि डोळ्यात आसवं”.
…कर्मचाऱ्याच्या मुत्यु नंतर ५० हजार रुपयांचा चेक ‘मदत’ म्हणून दिला.. पण प्रत्यक्षात ही मदतीची रक्कम हक्काच्या महागाई भत्त्यातूनच कपात झाली. कुटुंबीयांची दु:खद कहाणी — ना संपूर्ण भत्ता, ना खरी मदत, फक्त आश्वासन!
“स्व शिवहरी देवचे यांनी गावासाठी ऐकनिष्ठेने प्रामाणीक पणे आपले कर्तव्य बजावत असतांना,त्यांचा मुत्यु झाला कुटुंबीयांच्या हक्काचा न्याय
ग्रामपंचायतनी हिरावून घेतला,” ग्रामवासीयांनी व्यक्त केलेली आर्त भावना.”संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तातडीने राहणीमान भत्ता मिळावा, अशी मागणी मुत्यु झालेल्या कर्मचाऱ्याची पत्नी व नागरिकांतून होत आहे.
वरील बातमी परिवाराच्या वेदना आणि गाव-शहराच्या प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर मोठा प्रश्न उपस्थित करते.
…आता दोन सरपंच बदलून गेले ग्रामसेवक ही बदलून गेले आता नवीन ग्रामसेविका सुधा ग्रामपंचायतमध्ये आल्या आता ग्रामसेवीका आणि प्रशासनाकडून या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का,असे वेध गावकरी व त्या कुटुंबाला लागले आहेत.



