Home Breaking News संभापूर परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण;

संभापूर परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण;

पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल..!!

संदिप देवचे 9860426674

संभापूर:- गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असताना एकही चोरटा सापडलेला नाही, त्याचबरोबर एकही चोरी उघडकीस आली नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. अंधार होताच त्यांच्या मनात चोरट्यांची भीती दाटू लागली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात दहाहून अधिक ठिकाणी धाडशी चोऱ्या झाल्या असून परिसरामध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ पहावयास मिळत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संभापूर येथील चंद्रसिंह पवार यांची गाय व गोपालसिंह पवार या शेतकऱ्याचे तिन बैलांना चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, त्याची अंदाजे किंमत तब्बल एक लाख 10 हजार रुपये एवढी आहे.

शेंद्री शिवारातून प्रकाशसिंह पवार यांच्या शेतातील पंधरा पाईप व स्पिकंलर सेट चोरीला गेला असून, उमरा शिवारात शैलेंद्रसिंह ठाकूर यांच्या शेतात असलेल्या गोडाऊन मधून अठरा क्विंटल तुर व नऊ क्विंटल सोयाबीन असा लाखो रुपयांचा माल चोरीला गेला

असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

गावकऱ्यांची जोरदार मागणी:

परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून तपासाला गती द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous articleभाजपा नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची नवीन कार्यकारणीची बैठक मोठया उत्सवात संपन्न
Next articleजलंब ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांचा विविध मागण्यासाठी उपोषनाचा ईशारा