Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर शेतीविषयक माहिती मिळवावी…

हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर शेतीविषयक माहिती मिळवावी…

👉 ताकृअ शिवाजी मिराशे यांचे आव्हान.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 डिसेंबर 2025

तालुक्यातील शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरण्यासाठी महाविस्तार एआय अॅप हे मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन शेतीविषयक विविध माहीती उपलध्द करुन घ्यावी. शेतक-यांना माती तपासणी ते बाजारपेठेप्रयंन्त सर्व माहिती एकाच प्लॅटफार्मवर उपलब्द करण्यात आली आहे. असे हे अत्याधिक महाविस्तार एआय अॅप विकसित करण्यात आले आहे.शेतक-यांनी आपला फाॅर्मर आय-डी टाकुन नोंदणी केली आहे. एकंदरीत शेतीसंबंधी सर्वच माहिती उपलब्द करण्यात आली आहे. कृषि सहायक अधिकारी, कृषि मित्र , ग्रामरोजगारसेवक शेतक-यांना हे अॅप फाॅर्मर आय-डी किंवा मोबाईल नंबर टाकुन डाऊनलोड करीत आहेत.

या अॅपमध्ये पिक संरक्षण, हवामान अंदाज, खत व्यवस्थापण, बियाण्याची निवड, रोग किड नियंत्रण, बाजारभाव अशा विविध सुविधांचा समावेश आहे.या अॅपमुळे शेतक-यांना पिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तात्काळ सल्ला मिळु शकतो..कृषि अधिकारी यांच्या माहितीनुसार शेतक-यांचा वेळ आणी खर्च वाचु शकतो….आणी उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळते..हे अॅप मराठीभाषासह इंग्रजी भाषेतही उपलब्द आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांना हे अॅप वापरण्यास सोपे आहे..

शेतक-यांनी या अॅपचा स्वागत केले असुन, शेती करतांना शेतक-यांचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल…

कृषि विभागाने शेक-यासाठी अत्यंत महत्वाचे दिलासादायक व आधुनिक पाऊल उचलले आहे.

Previous articleजलंब येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती भक्तिभावात साजरी
Next articleजलंब येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद