
प्रतिनिधी / संतोष मोरे
बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता ते कारंजा रमजानपुर रस्त्याची दुरावस्था केव्हा बदलेल अशा प्रश्न या परिसरातील सुदन नागरिक करीत आहे. रस्ता अर्धवट म्हणजे चार किलोमीटर असुन त्यातील दोन किलोमीटर रस्ता गेली तिन चार वर्षे डांबरीकरण केला असुन उर्वरीत दोन किलोमीटर रस्ता अतिशय खराख व दुरावस्थेत आहे .की त्यावर जाणे येणे जिकरीचे झाले आहे.या कडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी आवर्जून दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते आहे.रस्ता वर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे.केव्हाही अपघात होऊ शकतो. हाता कारंजा रमजानपुर रस्त्याची एकदम चाळण झाली असुन हा रस्ता पुर्णतः उखडला आहे
पावसाळ्यात खड्डयात पाणी साचल्याने अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत.हाता गावाला एकमेव रस्ता हा हाता कारंजा रमजानपुर रस्त्या असुन या रस्त्याने खुप आवक जावक आहे. या परिसरातील दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात तसेच इतर प्रवासी वर्ग खुप मोठा आहे.
तर वाहनांची वर्दळ खुप मोठा प्रमाणात आहे .गावातील नागरिकांनी बरेच वेळा तक्रारी व निवेदन दिले. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे .तर लोकप्रतिनिधी तर त्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे
तरी संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधी हयांनी सुध्दा लक्ष देऊन हाता कारंजा रमजानपुर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरीत आहे.हाता येथुन दररोज निंबा,
नयाअंदुरा व शेगांव, अकोला येथे शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी ये जा करतात खराब रस्त्यामुळे खुप त्रास होतो व वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. तरी यांकडे अकोला बांधकाम विभाग यानी लक्ष देऊन रस्ताचे काम पुर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.



