बाळापुर प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती प्रीत्यर्थ ३/१/२०२६ रोजी महात्मा फुले विद्यालय पारस येथे अभिलाष दादा तायडे मित्र परिवार यांच्या विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
यावेळी अकोला येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग सर्जन श्री डॉ यश धनवानी तथा एम डी मेडिसीन श्री डॉ ऋषभ कोठारी हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या वतीने महामानवांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.नंतर श्री अभिलाष तायडे तथा डॉ यश धनवानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर रुग्णांची तपासणी करण्यात आले यावेळी जवळपास ४०० रुग्णांची तपासणी केली .या शिबिरामध्ये मोफत औषध वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक देशमुख, अनुराग काळपांडे,महेश तायडे, प्रज्वल खंडारे, वेदांत काळे, महेश उमाले,हर्षल लांडे, नितेश तायडे, विवेक सिंग,रितेश शिरसाट,गौरव तायडे, आनंद काळे, तुषार दांडगे, मयूर तायडे,ऋतिक घुले,नबील ,अमोल इंगळे यांनी परिश्रम घेतले.संचालन अंजू भोपळे मॅडम यांनी केले तर आभार पारस सेवा समितीचे राहुल राऊत यांनी मानले


