Home Breaking News वाडेगांव येथील एका घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक!

वाडेगांव येथील एका घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक!

भुमीराजा न्युज प्रतिनिधी/संतोष मोरे

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच धान्य, घरातिल सर्व महत्वाचे कागद पत्रे जळून खाक झाल्याची घटना दिनांक १३ फेब्रुवारी रोजी मध्य रात्री च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारत जवळच भाड्याच्या खोलीत एक मजूर निर्धार महीला सिंधू रमेश आकोटकर राहत आहे. रात्री एकटी महीला घरी होती.म्हणून आपल्या नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या घरातिल विधूतच्या ताराममधून शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे बोलले जात आहे. तर घराला आग लागलेली पाहून शेजारी यानी तातडीने आकोटकर याना माहीती दिली व आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली तर महिला घरी परत येताच घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे पाहून महीलेनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक धावून येवून दरवाजा उघडून पाहिले त्यावेळी घरातील जवळपास सर्वच संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले होते. नागरिकांच्या निदर्शनास आले. घरात घुसमटत असलेली आग नागरिकांनी अथक परिश्रम घेवून विझविली तोपर्यंत घरात काहीच शिल्लक राहिले नाही. लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच नगदी जवळपास सर्वच खाक होऊन नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराला आग कशामुळे लागली याबाबत कुठलीच माहिती हाती आली नसून लागलेल्या आगीत घरातील गैस सिलिंडर चा सुदैवाने स्फोट झाला नाही अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती असे त्यावेळी उपस्थित नागरिक बोलत होते.

Previous articleरमजानपूर्व तयारीसाठी जोरदार मागणी – पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निवेदन!
Next articleनिधन वार्ता