Home कृषीजागर कृषि वार्ता

कृषि वार्ता

पेरणी पुर्व मशागतीच्या कामाला आला वेग..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 24 मे 2026

खरीप हंगामातील बियाण्याची पेरणी करण्यासाठी बळीराजा सज्ज होतांना दिसत आहे..पण शेतक-यावरील संकटाची मालीका संपता संपेना …शेती कामासाठी पेरणी पुर्व मशागतीची कामे सध्या सुरु आहेत. डिझेलच्या टंचाईमुळे ट्ॅक्टर चालकाची चांगलीच तारांबळ उडत आहे..तरीही टॅ्क्कर चालक शेतक-याच्या जमिनीची मशागत करीत आहेत..जमिनीची नांगरणी, पलटी, पंची, रोटाव्हेटर, हळद पिकांचे बेड मारणे आदी पेरणी पुर्व मशागतीच्या कामांना वेग आल्याचे दिसुन येत आहे. रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असुन, बि..बियाण्याच्या भावाची चढ्या दराने विक्री होत आहे. कृषि विभागाने यावर करडी नजर ठेवत अंकुश ठेवण्याचे काम करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे..

Previous articleलोहारा गावातील ग्रामपंचायत चालत आहे वाऱ्यावर, पाण्याची समस्या कोणाकडे मांडावी, नागरिक त्रस्त, अधिकारी मस्त