
हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
शेती व्यवसायात कोणतीही शाश्वती नाही -विलास शिंदे*
राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान
शेती हा अतिशय अवघड व्यवसाय आहे, त्यामध्ये कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायातील अडचणी समजून घेऊन आपल्या ताकदीच्या जोरावर मार्ग शोधला पाहिजे. आपणच आपली व्यवस्था केली पाहिजे असे प्रतिपादन सह्याद्री फार्म्सचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले. जय किसान फार्मर्स फोरम आणि गोदावरी बायो फर्टिलायझर्स इंडस्ट्री तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कृषिरत्न पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयराम पूरकर, मुंबई आकाशवाणी विविधभारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके, मल्टीमोलचे संचालक शशिकांत शेट्टी, इफकोच्या साधना जाधव, जेष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ शेतकऱ्यांचा ट्रॉफी, पैठणी साडी, शेतकरी गौरव विशेषांक देवून सपत्निक सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभाच्या सुरुवातीला जय किसान फार्मर्स फोरम चे अध्यक्ष प्रा डॉ संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनकार्य आणि संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये यादवराव केशवराव ढवळे, दिपक दगुजी पवार, श्रीराम भानुदास तायडे, निवृत्ती अशोक शिंदे, प्रकाश केशवराव गडदे, गणेश एकनाथ पवार, तेजस नर्सरी, संतोष बाबुराव गवारे, विक्रम बाळासाहेब महाले, सचिन सोनोने, शाम भगवान बन, सय्यद गनीभाई हुसेन, युवराज बाळासाहेब जाधव, गजानन भानुदास परिहार, प्रितम दिलीप शिसोदे, बाळू पंडित बहिरम, अभिमन्यू लक्ष्मण ठाकरे, दत्तू केवजी बागूल, देवराम अनाजी पालवी, बापू वसंत पगार, प्रविण छगन जाधव, अभयसिंह मोहनराव पाटील, राजेश गंगाधर मुसळे, नितीन लक्ष्मण शेवाळे, अनिल भाऊराव देवरे, श्वेता संजय इंगळे, सुनिल दामोधर धात्रक, रमेश पांडुरंग ठोसरे, शिवकृपा ऑनलाईन ई-सेवा आधार केंद्र, नंदिनी महेंद्र जाधव, रोहिदास बापूराव पाटील, पांडव जीवामृत युनिट, युवराज जाधव, समीर शेख, रविंद्र दिनकर जगताप यांचा समावेश होता.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांनी सुमधुर गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तर प्रसिद्ध निवेदक व कलावंत डॉ. तुषार वाघुळदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपीनाथ लामखडे, गोरक्षनाथ जाधव, भगवान खरे, बाळासाहेब मते, निवृत्ती न्याहारकर, सविता जाधव, मयुर गऊल, सागर रहाणे, शाम गोसावी, वसंत आहेर, सुयोग जाधव, राजेंद्र धोंडगे, नाना पाटील, संकेत लामखडे, अशोक देशमुख, संदिप उफाडे, सुनिल गमे, स्नेहल लामखडे आदिंनी केले आहे.



