भुमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर:- बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता ते कारंजा रमजानपुर रोड चे डांबरीकरण दोन किलोमीटर दोन तिन वर्ष पासून केले असून उर्वरित दोन किलोमीटर रोड अतिशय खराब झाला आहे .हाता हे परिसरातील मोठे गांव असून येथून प्रवासी शेकडो विद्यार्थी व्यापारी व प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात गावाबाहेर पडतात .मात्र रस्ता रोड अतिशय खराब झाला असून त्यावर खड्डे व गोटे दगड झाले आहेत त्यामुळे प्रवास करताना व वाहने चालविताना खुप त्रासदायक ठरत आहे.अधिकारी पदाधिकारी हे त्याकडे अक्षय दुर्लक्ष करताना दिसत आहे .अनेक अपघात सुध्दा झाले किताब जनाना हात पाय व कबलेचे आजार तसेच गाड्यांचे नुकसानास सामोरे जावे लागते .तरी संबंधित विभाग हयांनी ताबडतोब रोड दुरुस्ती व डांबरीकरण करण्याचे काम हाती घ्यावे अन्यथा हाता वासीय नागरीक हाता फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करणार आशयाचे निवेदन मा जिल्हाअधिकारी साहेब अकोला
व प्रतिलिपी म्हणुन मा. मुख्यअभियंता जिल्हा परिषद अकोला,उपविभागीय अधिकारी बाळापूर,तहसीलदार बाळापूर
ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ हयांना देण्यात आले आहे तरी संबंधित विभाग हयांना विनंती करण्यात आली असून शक्य तितक्या लवकर रोड चे डांबरीकरण करण्याचे काम करण्यात यावे




