प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्र्वशांती बुध्द विहार व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान निंबा फाटा कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती संपन्न. सर्व प्रथम आईरमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात
आली.रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि भारतीय इतिहासातील एक महान त्यागमूर्ती आहेत. त्यांनी अत्यंत गरिबीत व संघर्षात बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी भक्कम आधार दिला. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८रोजी दाभोळजवळील वणंद येथे झाला. बाबासाहेबांच्या अनुयायी त्यांना आईरमाई म्हणतात .रमाबाई भीमराव आंबेडकर त्याच्या माहेरचे नाव रमाबाई भिकू धुत्रे असे होते.त्याचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ दाभोळ, रत्नागिरी येथे झाला. आईरमाई चे लग्न: १९०६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला .
त्याचे जीवन संघर्ष लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे खूप गरिबीत आणि संघर्षात बालपण गेले .त्यागाची मूर्ती म्हणून रमाबाई आंबेडकर यांना ओळखले जाते बाबासाहेब परदेशात शिकत असताना आणि त्यानंतर सामाजिक कार्यात व्यस्त असताना, रमाईंनी घर सांभाळत अत्यंत गरिबी सहन केली, पण बाबासाहेबांच्या कार्यात कधीही अडथळा आणला नाही.मुले यशवंत यांच्यासह चार मुलांचा त्यांनी सांभाळ केला, मात्र दुर्दैवाने तीन मुलांचे अकाली निधन झाले . रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू २७ मे १९३५ रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठि मागे ते खंबीरपणे उभ्या होत्या म्हणून त्यांना त्यागमूर्ती किंवा आई रमाई म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांना रमाबाई साहेब असे म्हणत .ज्यामुळे त्यांचे बाबासाहेबांच्या कार्यावर किती विश्वास होता हे दिसून येते.
आज संपुर्ण भारत भर माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्र्वशांती बुध्द विहार येथे उपस्थित म्हणून राजु मोरे, मधुकर मोरे,प्रशांत मोरे,आकाश मोरे, मनोज गव्हादे,सिध्दार्थ खंडारे, महेंद्र मोरे,सुनिल मोरे,तानाजी मोरे,धम्मपाल मोरे,यशोधरा महिला संघ व मोरे मिञ संघ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




