Home कृषीजागर हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार...

हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार करायला लावणारा विषय आहे.

👉 भागवत देवसरकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील परिषद राज्यअध्यक्ष यांचा आरोप.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 07 एप्रिल 2022

हदगाव- हिमायतनगर
तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून, मोठ्या प्रमाणात गाळप केला आहे, सध्या अजूनही ऊस आणला जात आहे, यामुळेच स्थानिक तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढीस भर पडली, जाणीवपूर्वक याला बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे, आजच्या या परिस्थितीमध्ये ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्याचे खुप अतोनात हाल होत आहेत. रखरखत्या उन्हात ऊस तोडणी करण्यास कामगार ही धजावत नाहीत. कारखान्याची तोडचिठ्ठी देणाऱ्या स्लीपबॉयपासून ते कारखान्याच्या कार्यकारी संचालकापर्यंत प्रत्येक जण या गोष्टीवर लक्ष देत नाहीत. ऊस तोड करणारे मुकादम तर जावयापेक्षा ही अधिक अडवनुक करतात. आणि कारखान्याचे अधिकारी याकडे डोळेझाक करतात. असाही आरोप त्यांनी केला आहे.
ऊस तोडण्याची, मोळ्या बांधण्याची आणि उसाची वाहतूक करण्याची त्यांची ठरलेली मजुरी त्यांना कारखान्याकडून मिळत असताना, व तोडचिठ्ठीच्या क्रमाने एखाद्याचा ऊस तोडणे बंधनकारक असतानाही, हा मुकादम आणि ऊस तोड कामगार पुन्हा शेतकऱ्याकडून पैसे घेतो. आणि शेतकऱ्याची लूट करणाऱ्याच्या साखळीमध्ये सहभागी होतायत. कारखाना प्रशासन याकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक शेतकऱ्याला अडचणीत आणत आहे. काही ठिकाणी निव्वळ शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये एकरी बक्षीस हवे असते तर काही जण तर दारूची बाटली मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावायला तयार नाहीत, ट्रक्टर ड्रायव्हर डब्बा,प्रत्येक ट्रीपला पैसे हाती पडल्या शिवाय ट्रॅक्टर हलवत नाही. शेतकरी स्वताला कमनशिबाचा एक भाग आहे असे समजून ते सारे आपण भोगलेच पाहिजे. त्या पलीकडे काही इलाज नाही असे म्हणून कपाळाला हात लावून सतरा ठिकाणी स्वत चा अपमान कुठपर्यंत करून घ्यायचा या प्रश्नाने गांगरून गेला आहे. कारखान्याशी संबंधित असलेले सगळे घटक शेतकऱ्यांची अशी अवहेलना करत आहेत. म्हणून शेवटचा उपाय म्हणून शेतकरी आपल्या पोटच्या मुला प्रमाणे सांभाळले पिक आज घडीला पेटवण्यातच धन्यता मानत आहे . म्हणून गेल्या चार दिवसांत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपले ऊस स्वतःच्या शेतामध्ये पेटवून दिल्याचे प्रकार घडत आहे.

बारा महिने पोटच्या मुलाप्रमाणे खत, पाणी घालून सांभाळलेला ऊस , हा कारखान्याच्या उचित नियोजना अभावी शेतातच पेटवण हे कारखाना परिसरातीलच शेतकऱ्यांवर अशा प्रकारची वेळ येते असेल तर तालुक्यातील इतर भागातील परिस्थितीचा विचार करणे क्षमतेच्या पलीकडीचे आहे,तालुक्यात शेतकऱ्यांचा शेकडो एकर शेतातील उभा ऊस आणि शेती विषयीची स्वप्नांचा आगडोंब उघड्या डोळ्यांनी पाहताना मानवी काळजाला झळा लागल्या शिवाय राहात नाहीत.शेती आणि शेती क्षेत्रावर आलेल्या या वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी डोळे उघडून पाहणार आहेत का❓

शासन व कारखाना प्रशासन योग्य ती कार्यवाही करणार आहे का❓
या सर्व परिस्थितीमध्ये तात्काळ योग्य प्रकारचे पावले उचलणे अपेक्षित आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागण्यास उशीर लागणार नाही. असेही ते म्हणाले.

Previous articleमाणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.
Next articleसंजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट