Home समाजकारण माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.

माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.

👉‌ हभप पंढरीनाथ महाराजमिरकुटे यांचे प्रतिपादन

मारोती अक्कलवाड
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 07 एप्रिल 2022
अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा सोहळा मोजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील किर्तन रुपी सेवा करतांना, या जगात माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही झाली. गुणात्मक वाढ होणे गरजेचे आहे असेहि हभप मिरकुटे महाराज यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले या जगातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे माणसाला देव भेटणे होय. संत सावता माळी यांनी शेतातील भाजीपाला पिकवितांना त्या शेतातील माती तुडवत तुडवत साक्षात पांडुरंग अवतरले. आपले काम आपण नित्यनेमाने करावे असेही ते म्हणाले.
आपल्या गावातील लोकांनी एकमेकांना सहकार्य केल्यास गावांचे नंदनवन फुलेले, गावातील लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. तरच गाव पुढे जाण्यासाठी वेळ लागणार नाही.
गावचा पुढारी चांगला तर गाव चांगला असेही ते म्हणाले.
गावचा पुढारी दुरदृष्टी असावा. दुरदृष्टी असणार्या पुढार्यांचया गावातील लोकांनी पाठीमागे राहावे.
जलसागर – जलसागरातुन जाण्यासाठी पोहता आले पाहिजे.
विद्यासागर- विदयासागरातुन जातांना ज्ञान मिळविता आले पाहिजे. आणि भावसागर पार पाडत असतांना कोणाची निंदा, चुगली, चेष्टा करु नका. कुणाला मागे खेचु नका, चांगले बोला अन्यथा बोलुच नका, चांगले राहा, चांगले वागा, आईवडील यांची सेवा करा. आईवडीलांनी दिलेला आशिर्वाद देवालाही कमी करता येत नाही. आणि आई वडीलांनी दिलेला शाप देवही कमी करु शकत नाही. म्हणुन आई-वडील यांची सेवा करा असेही ते शेवटी म्हणाले.

Previous articleतळपत्या उन्हात
Next articleहदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार करायला लावणारा विषय आहे.