Home कृषीजागर भाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!

भाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!


————
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- उन्हाळ्यामुळे उत्पादकता कमी झाल्यामुळे सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले असल्याने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी खुश झाल्याचे दिसून येत आहेत. सध्या भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो ६० ते ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगी ६० रुपये, दोडके ६० रुपये, दिलपसन ६० ते ७० रुपये, पालक, चुका १० ते १५ रुपये जुडी, कोथिंबीर १०० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, गवार, चवळी ६० रुपये,सिमला ६० रुपये,कारले ८० रुपये, बटाटा ३० रुपये किलो याप्रमाणे भाजीपाला विकत आहे. यात भाजीपाल्याच्या दर्जानुसार दर कमी अधिकही आहेत. सध्या जून महिना सुरु असून देखील पाऊसच पडला नसल्यामुळे कडक उन्हाच्या चटक्यामुळे भाजीपाला पिकाच्या झाडांना फूले-फळ धारणा अतिशय कमी लगडते. त्यामुळे उत्पादकता घटत आसल्याने बाजारात आवक कमी होवून भाव वाढले आहेत. सातत्याने भाजीपाला पिक घेणारे शेतकरी आता कुठे सुखावलेले दिसू लागलेत. ऐरव्ही, हिवाळ्यात असंख्य शेतकरी नगदी पिक म्हणून भाजीपाल्याच्या विविध वाणांची लागवड करतात. त्या दिवसात मुबलक पाणी व हवामान पोषक असल्याने उत्पादकता भरघोस असते. यामुळे बाजारात आवक वाढून दर कोसळतात. अशा वेळी शेतकऱ्यांना आपला भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागतो. काढणी,वाहतूकीचा खर्चही निघत नाही. दर कोसळले म्हणून शेतकरी वैतागून भाजीपाला गुरांना खाऊ घालतात. आता पाण्याची टंचाई,उष्णतेत वाढ कायम यामुळे उत्पादकता कमी येत असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. याचा फायदा हा भाजीपाला पिकात सातत्य ठेवणा-या शेतकऱ्यांना होतो. हे पिक नगदी असल्याने शेतकऱ्यांना ते परवडते. परंतु हिवाळ्याच्या दिवसात दर पडतात अशा प्रसंगी भाजीपाला पून्हा नकोच म्हणत शेतकरी मोडून टाकतात. त्यावर नांगर फिरवतात. त्या उलट उन्हाळी उष्णतेच्या दिवसात मात्र हे पिक उत्पादक शेतकऱ्यांची चांदी करते. भाव वाढल्याने गरीब ग्राहक,गृहणी भाजीपाला खरेदीस हात अखडतात आहेत तर सधन व्यक्ती कितीही भाव वाढला तरी भाजीपाला घेत आहेत. परभणी जिल्ह्यातील मरसूळ, पांगरा, सिंगणापूर, रेणकापूर, गोविंदपूर, पिंपळा लोखंडे, चांगेफळ येथील शेतक-यासह परभणी, सेलू,पूर्णा, जिंतूर,सोनपेठ,गंगाखेड,पालम, मानवत तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके घेत असतात. नांदेड शहरातील तरोडा नाका येथे दररोज भल्या पहाटे भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असते. तेथून सर्व ठिकाणच्या मार्केट मध्य त्याची रवानगी होत असते.

Previous articleनातं प्रेमाचं
Next articleहेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!