Home Breaking News प्राचार्य श्री प्रदिप सांगळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

प्राचार्य श्री प्रदिप सांगळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

*मी नाशिककर न्यूज तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
यावेळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हिंदी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री प्रदिप सांगळे सर यांनी केलेल्या विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व विद्यालयात राबविलेल्या विद्यार्थी कल्याणकारी उपक्रम आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हरीश आडके व प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉ.सीताराम कोल्हे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलूगुरू जयदीप निकम शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, नाशिक महानगर पालिका शिक्षणाधिकारी बी टी पाटील उपस्थित होते
*निवड समितीचे प्रा.विजय पाटील,पुरुषोत्तम रकिबे,बापूसाहेब कारवाळ,नरेंद्र ठाकरे, रवींद्र सोनजे उपस्थित होते

*मी नाशिककर न्यूजचे राजाभाऊ जाधव,संचालिका स्वाती जाधव, संपादक राजेंद्र पवार व कार्यकारी संपादक संतोष विसपुते आदी मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते
याप्रसंगी संस्थेचे शिक्षणाधिकारी व ndst सोसायटीचे चेअरमन श्री मोहन चकोर सर एकलहरे विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे प्रा दिलिपराव कुटे,शंकर सांगळे सर,बी के सानप सर अनिल घरटे,के पी कापडी, काळे एस के,काळे के के,भाबड यु एस,सांगळे डी आर,जगदीश दुसाने,यादव सी एस प्रजापती एन जे,श्रीमती रेखा धात्रक,रावसाहेब कातकाडे,अरुण घुगे,साहेबराव वाघ आदि उपस्थित होते

Previous articleजालना येथील घटनेच्या निषेधार्थ वाडेगाव बंद
Next articleकावड वाहून नेणाऱ्या शिवभक्तांवर काळाचा घाला, टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू