प्रदेश अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांची उपस्थिती.
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
नाशिक ( ) भारतीय जनता पार्टी ओ बी सी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.योगेश टिळेकर रविवार दिनांक १४ जुन रोजी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत भाजप नाशिक वसंत स्मृती कार्यालयात दुपारी ४ वाजता नाशिक महानगर जिल्हा, नाशिक दक्षिण ग्रामीण, नाशिक उत्तर ग्रामीण या भाजपच्या तिन्ही जिल्ह्यांचा मेळावा होणार असल्याचे भाजप ओ बी सी मोर्चाचे नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष प्रकाश चकोर यांनी सांगितले. महाराष्ट्रात ओ बी सी समाजाचा बहुसंख्य वर्ग भाजपला मानणारा आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी माधव पॅटर्न राबवून महाराष्ट्रात ओ बी सी समाजाचे मोठे संघटन उभे केले होते. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीना एकत्र करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले होते. महाराष्ट्रात ओ बी सी संघटन वाढावे. ओ बी सी समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडले जावे व सोडविणे, जास्तीत जास्त ओ बी सी समाजाला भाजप प्रवाहात आणावे म्हणुन आ. योगेश टिळेकर राज्यात दौरा करत आहे. आ. योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास नाशिक महानगर व ग्रामीण भागातील सर्व ओ बी सी बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवा वर्गाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, ओ बी सी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश चकोर यांनी केले आहे.




