Home Breaking News आंब्याला आला मोहोर!

आंब्याला आला मोहोर!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 4 फेब्रुवारी 2024

यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने, पौष मराठी महिन्यात फळांचा राजा आंब्याला झाडाला प्रचंड प्रमाणात मोहोर आल्याने यावर्षीचा आंब्याच्या रसाची चव चांगलीच चाकता येणार आहे.
जिकडे पाहावे तिकडे शेतातील प्रत्येक आंब्याला मोहोर आल्याने आंबे खाणा-याच्या तोंडाला पाणी सुटले आहे. काही ठिकाणी बारीक बारीक कै-या लागत असुन, जास्त हवा सुटल्याने त्या छोट्या कै-या खाली गळुन पडत आहेत. आलेल्या मोहोराची जर फळधारणा झाली तर फळांनी झाडे जमिनीलगत खाली वाकल्याशिवाय राहणार नाहीत. असे जाणकार शेतकरी बोलुन दाखवित आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे. असे शेतकरी सांगत आहेत.

Previous articleमुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…
Next articleशेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव!