👉 शेतक-यांची हेळसांड..
हिमायतनगर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मनमानी चालु असुन, एकाच शेतक-यांच्या शेतात कोटींच्या योजना देऊन इतर शेतक-यांची जाणीवपुर्वक हेळसांड होत आहे…
👉 प्रभारी तालुका कृषि अधिकारी आदरणीय शिवाजी मित्राने यांचा भ्रमणध्वनी प्रभारी उपविभागीय कृषि अधिकारी हे फोन घेत असुन, हिमायतनगर तालुक्यात शेतक-राचा कैवारी कोण? हा यक्षप्रन्श निर्माण झाला आहे आहे…एकीकडे कार्यालयात सतत कार्यालयीन अधिक्षक या..ना..त्या.. कारणाणाने गैरहजर राहत असुन, आज तालुक्यातील पत्रकार बांधवांचे शिष्ठमंडळला असे निदर्शनास आले आहे… फक्त कृषि अधिकारी एम. एस. काळे, कनिष्ठ लिपिक अमोल सुदेवाड, सेवक एन. गारोळो, पि.एम किसाननचे कंत्राटी कर्मचारी जाधव इत्यादी कर्मचारी उपस्थीत होते…विद्यमान आमदार महोदयांना तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अशी विनंती केली आहे…गलेलठ् पगार घेणा-या प्रभारी तालुका कृषिअधिका-यासह , सहायक अधिक्षकांची झाडाझडती घ्यावी..अन्यथा तालुक्यातील शेतकरी बांधव आक्रमक पवित्रा घेतील यांची नोंद घ्यावी ..अन्यथा जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषणस बसणार आहेत..अशी माहीती तालुक्यातील शेतकरी संघटनांनी दिली आहे…



