Home Breaking News विठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.

विठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.

@ वारी पंढरीची @

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 24 जुन 2022

संबंध वारक-यांचे ह्रदयस्थान असणा-या पंढरपूर येथील भगवंताचे स्थान म्हणजे विठ्ठलाची पंढरी…
माऊली माऊली.. म्हणत तुकोबांचा जयघोष करीत अगदि हर्ष उल्हासात महिलांनी भजन म्हणत पायवारीला सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाचे संकट होते. म्हणुन पायवारी बंद होती..कधी कधी पाहु माझ्या सावळ्या विठुरायाची मुर्ती.. आणि कधि कधि डोळे भरून पाहु विठ्ठल रुक्मिणीला या उदात्त हेतूने, पायवारीला निघालेल्या सवना, टेंभी, आंदेगाव येथील महिला मंडळानी विठ्ठलाचे दर्शन घेतले… आणि समाधान व्यक्त करत भ्रमणध्वनीवर आमच्या प्रतिनिधींना फोटो पाठवुन प्रतिक्रिया दिली. यंदा आम्ही पंढरीच्या विठलांला एक साकडे घातले आहे. भरपुर पाऊस पडुन दे.. सर्वांना सुखी ठेव. अशी प्रतिक्रिया सर्व महिला भगिनींनी दिली.

Previous articleमहाराष्ट्राच्या अहिल्या शिंदे चा सुवर्ण इतिहास
Next articleखासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम!