Home Breaking News “पु. ल. देशपांडे “यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर ग्लोबल पुलोत्सव साजरा होणार

“पु. ल. देशपांडे “यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर ग्लोबल पुलोत्सव साजरा होणार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतीचा जागर जगभरात होणार आहे.’आशय सांस्कृतिक ‘ तर्फे ‘पु. ल. परिवाराच्या ‘ सहयोगाने आयोजित करण्यात येणारा ‘पुलोत्सव ‘ आता ‘ ग्लोबल पुलोत्सव ‘ होणार आहे. येत्या वर्ष भर हा महोत्सव साजरा होणार असून या अंतर्गत देशातील 23 श हरांसह पाच खंडातील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रम रंगणा र आहेत.
राज्याचे मंत्री आणि ग्लोबल पुलोत्सवाचे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी मंगलवारी ‘पुलं’ च्या जन्मदिनानिमित्त पत्रकार परिषदे त ही घोषणा केली. या प्रसंगी मोहत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.8 नोव्हेंबर या कालावधीत पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चंद्रपुर,, नागपुर या शहरांसहइंदौर, बड़ोदा,, बंगळू र, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, आदी शहरांमध्ये महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहे त.
तसेच, जगभरातील लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, वैशिंग्टन, न्युयॉर्क, शिकागो, टोरांटो, सिडनी,आदी शहरांमध्येही मोहत्सव साजरा होणार आहे.

प्रतिक्रिया -:महाराष्ट्राच लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर शासन “ग्लोबल पुलोत्सव ” साजरा करुन करणार आहे, ही अभिनंदनीय बाब आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्या कार्याच्या स्मृतीचा गंध “ग्लोबल पुलोत्सवा ” च्या रूपाने जगभर दरवळणार आहे, व मराठी साहित्य व संस्कृतीचा जगभर प्रचार-प्रसार होणार आहे.

हेमंत शिंदे
( समन्वयक )
पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

Previous article*शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी निवड*
Next articleन्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश