Home गुन्हेवृत्त मुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…

मुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…

👉🏻हिमायतनगर शहरात खळबळ जनक घटना…पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल…

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरतील नेहरूनगर परिसरात असणाऱ्या अल्पवयीन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेम सबंध असल्यामुळे इतर मुला सोबत असल्यामुळे तिच्याच आई-वडिलांनी आपले नाव समाजामध्ये बदनाम होईल या उद्देशाने रात्री रागाच्या भरात विळा व लाकडाने मुलीच्या डोक्यावर मारहाण करून तिचा मध्यरात्री खून केल्याची खळबळ जनक घटना शुक्रवारी सकाळी उत्तरीक तपासणी अहवालाच्या नंतर उघड झाली आहे त्यामुळे हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या रामराव मारोती पवार व पंचफुलाबाई रामराव पवार यांच्या मयत मुलीचे अंकिता रामराव पवारचे प्रेम संबंध इतर मुलाशी असल्यामुळे ती तिच्या घरी माझे लग्न लावून द्या असा तगादा लावत होती त्या रागाच्या भरामध्ये आपली समाजामध्ये बदनामी होईल या रागाच्या भरात तिच्या आई-वडिलांनीच मध्यरात्री झोपेत असताना त्यांच्या राहत्या घरी वीळा व लाकडाने तिच्या डोक्यामध्ये मारहाण करून तिचा खून केल्याची खळबळ जनक घटना दिनांक एक फेब्रुवारी रोजी घडली परंतु हा प्रकार अगोदर लपण्यासाठी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते या संदर्भात परिसरातील नागरिकांना शंका आल्याने मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा करून मुलीला शासकीय रुग्णालयात पाठवले त्यानंतर हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या शव विच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर मारहान झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्या वरून या मुलीचा खून झाला असे सिद्ध झाले त्यामुळे हिमायतनगर पोलिसांनी घटनेचा तपास करून मुलीच्या वडिलांची व आईचां तपास केला असता त्यांनीच तिचा खून केल्याचे सांगितले त्यामुळे हिमायतनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी ए.एस.आय. कोमल कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वडील रामराव मारोती पवार व आई पंचफुलाबाई रामराव पवार यांच्याविरुद्ध कलम 302 ,34 प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार व पोलीस उपआधीक्षक भोकर संपते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी हे करीत आहेत

Previous articleहातात सगळं आयतं पाहिजे .
Next articleआंब्याला आला मोहोर!