Home Breaking News ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय संभापूर येथे ग्रामसभा संपन्न..!

ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय संभापूर येथे ग्रामसभा संपन्न..!

ग्रामसभेला संगणक परिचालक व सदस्यांची दांडी.

संभापूर:-(अजयसिंह राजपूत) ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती.सभेसाठी सरपंचांच्या सहीने नोटिसा काढल्या होत्या, दवंडी देण्यात आली होती.संभापूर येथील सरपंच सौ.ज्योतीताई विलाससिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेचे संपूर्ण कामकाज ग्रामसेवक सि एम जाधव यांनी पाहिले. ग्रामसभेत गावच्या विविध विकासाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले. विविध योजनांचे कामे चांगल्याप्रकारे व उत्तम दर्जाची करण्यात यावी. प्रामुख्याने – नळपाणी पुरवठा योजना,विद्युत नविन पोल घेणे, शेंद्री व संभापूर करिता डिपी बसविणे, मुख्य रस्त्यावरील असलेले अतिक्रमण निष्कषित करणे, संविधान भवन बांधणे, व्यायामशाळा, व ५ ही गावांतील शाळांना व ग्रा. पं भवनासाठी संरक्षण भिंत उभारणे या साठी ठराव पारीत करण्यात आले.
नळपाणी ‘पुरवठा साठी स्वतंत्र योजना योजनेत प्रामुख्याने उमरा, (लासुरा) संभापूर, शेंद्री,हिंगणा या मिळून स्वतंत्र योजना निर्माण व्हावी असे सर्वानुमते ठरले. स्मशानभुमी सुशोभिकरण करणे, संविधान भवन इ. कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी. तसेच नवीन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये गावाचा समावेश असुन या योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी
सरपंच सौ ज्योतीताई वि.पवार
उपसरपंच राष्ट्रपाल बलीराम दांडगे, तसेच सदस्य गजानन गावंडे,मधुकर गवारगुरु,सौ संगिता गवारगुरु,सचिव सी.एम.जाधव,शिपाई कर्मचारी मंगलसिंग इंगळे तंटामुक्ती अध्यक्ष भरतसिंग पवार, राजकिरण दामोधर, निलेश तायडे,शिवसिंग पवार भगवानसिंग इंगळे, डॉ राजेश तायडे,प्रेमसिंग पवार, सुदर्शन गवारगुरु, गुमानसिंग पवार, ठाकुर मामा (उमरा), शुभम पवार, विशाल पवार.ग्रामसभेस संभापूर,हिंगणा,उमरा,लासुरा, शेंन्द्री येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*विशेष म्हणजे ग्रामसभेत सदस्यांची व संगणक परिचालकाची दांडी* ग्रामसभेत बरेच सदस्य व संगणक परिचालक उपस्थीत नसल्याने चर्चेचा विषय ठरला आहे तर मोजकेच ग्रामपंचायतीचे सदस्य हजर पहायला मिळाले तर अनेक सदस्यांचे पतीराजच सदस्य म्हणुन हजर असतात त्यामुळे ग्रामसभेचे महत्व यांनाच नसल्याने नावालाच ग्रामसभा होतात की काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडतो आहे. तसेच गावामध्ये अनेक मुलभुत सुविधाची समस्या नागरिकांना होत असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये गावामध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोब आहे आठ दिवसानंतर एकदाच नळाला पाणी येते.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Previous articleशेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला – विकास वाहुळ
Next articleघरकुल योजनेचा लाभ घेतलेले क्षेत्र संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) कमी करा