Home Breaking News हिमायतनगर बाजारात युरीया खतांची टंचाई!

हिमायतनगर बाजारात युरीया खतांची टंचाई!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 09 जुलै 2023

पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाशची अत्यंत आवश्यक असतांनाच, जुन महिन्यातच कृषि सेवा केंद्राचे सर्व संचालक यांनी युरीयांची टंचाई भासविली.
गरीब, होतकरु, अत्यंत कष्टाने काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवित असणारा शेतकरी, शेवटी कुठे, कधी, केंव्हा कमी पडला असेल तर देवच जाणे.
बेंबीच्या देठाला ओरडुन जगाला आपल्या संसाराचे सुख सांगणारा एक इनामदार शेतकरी, हतभल झाल्याचे चित्र दिसत आहे. पिकांच्या वाढीसाठी नत्र है अत्यंत आवश्यक आहे. पण कृषि सेवा केंद्राचे संचालक आणि संबंधित अधिकारी यांच्यात या खरीप हंगामात किती? केंव्हा, कधी बैठकी संपन्न झाल्यानंतर त्या बैठकीचा ईतिवृतांत कोणी, कुठे प्रसिद्ध केला आहे. यांचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
येत्या दोन दिवसांत युरीया खत हिमायतनगर बाजारात उपलब्ध करून देण्यात यावे. कशी मागणी तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवर बोलतांना सांगितले आहे.

Previous articleसावधान सत्ता वंचितांनो….!!
Next articleमनसेच्या एक सही संतापाची मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद..