Home Breaking News मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क

खामगाव- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज २९ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरकारने ४० दिवसांचा वेळ घेऊनही मराठा आक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत असून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगाव सकल मराठा समाजाच्या वतीने येथील टावर चौकात आज २९ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजण व पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाज बांधव संतोष येवले, प्रविण कदम, शंकर खराडे, शिवाजी जाधव, कडूचंद घाडगे यांनी आमरण उपोषणाला तसेच उपस्थित इतर समाज बांधवानी साखळी उपोषण करण्यास सुरूवात केलेली आहे.

Previous articleनाशिक मधील मनसे विद्या र्थी सेनेची बैठक संपन्न.
Next articleॲड. प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगेंना पत्र!