भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे
बाळापूर : बाळापूर येथील सर्व मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहाची नमाज स्थानिक ईदगाह मैदानावर सकाळी ठीक ८:०० वाजता अदा केली. यावेळी शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांनी वेळेवर ईदगाहवर उपस्थित राहून नमाज अदा केलेली, ईदची नमाज शांततापूर्ण व सामूहिक वातावरणात पार पडली. ईदच्या नमाजेची इमामत व खुतबा खतीब सय्यद नातीकुद्दीन साहेब आणि खतीब सय्यद ऐनुद्दीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. उलेमा-ए-कराम यांनी नागरिकांना स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले आहे.ईद-उल-अजहाच्या या पवित्र सणानिमित्त मुस्लिम समाजाला बंधुभाव, त्याग, ऐक्य आणि कुर्बानीचा संदेश समाजात पोहोचविण्याची शिकवण देण्यात आली आहे. तसेच प्रशासन व स्थानिक समित्यांच्या वतीने ईदगाह परिसरात आवश्यक सुविधा आणि योग्य व्यवस्था पूर्ण करण्यात येत असून, नमाज्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.




