Home Breaking News रामकुंड पंचवटी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा

रामकुंड पंचवटी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा

गंगा गोदावरी महाआरती

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

नाशिक (:प्रतिनिधी )हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती, नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा शनिवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6वाजता रामकुंड, पंचवटी येथील अहिल्या घाट येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.

“महा कुंभ –या संकल्पनेवर आधारित होणाऱ्या या भव्य दिव्य सोहळ्यात गोदा महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध उपक्रम पार पडणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील तीर्थक्षेत्रांचे जतन, घाट, मंदिरे, धर्मशाळा आणि समाजहिताची अनेक कार्ये उभी केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या सोहळ्यात हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक समितीने दिली.

या कार्यक्रमास सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून गंगा गोदावरी आरती साठी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे, होळकर घराण्याची वंशज मुकुंद राजे होळकर, बाजीराव शिंदे साहेब, पणन संचालनालय पुणे, आमदार राहुल ढिकले, साधू संत, उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची साक्षीदार व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने समिती अध्यक्ष समाधान बागल यांनी करण्यात आले आहे.

या प्रसंगी समिती सदस्य मार्गदर्शक दिगंबर भाऊ मोगरे,राजेंद्र बागुल,ऋषीं ढापसे, विनायक काळदाते, संगीताताई पाटील, कोथिंबीर दादा अमोल गजभार, योगेश पानसरे, श्याम गोसावी, भूषण जाधव, प्रशांत बागल, भांड साहेब, राजाभाऊ बदाड देवराम रोकडे, वैभव रोकडे, अण्णासाहेब सपनार, कल्पेश शिंदे, शिरोळे सर, इतर समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleकृषि वार्ता
Next articleनांदेड विधानपरिषदेसाठी पहिला अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने; राजकीय वर्तुळात खळबळ..