Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या कडून लोहारा गावात मोफत पाणी वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या कडून लोहारा गावात मोफत पाणी वाटप

बाळापूर येथील अधिकारी यांना गावातील व्यक्तींचा पाण्यासाठी जीव गेल्यावर जाग येईल का?*

@मुके जनावरांनी पाणी कोठे प्यावे@

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे

बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील चार महिन्यांपासून पाणी टंचाईचे चटके बसत आहे.तरी याकडे अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील अधिकारी हे सुस्त असल्यामुळे जाग आलेली नाही. परंतु हाता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांना माहिती पडताच त्यांच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतला कि लोहारा गावात आपला सघटने मार्फत मोफत पाणी वाटप करायचे आहे. म्हणून आज पासून लोहारा गावात मोफत पाणी वाटप चालू केले आहे. गावातील नागरिकांनी सर्व सदस्यांचे धन्यवाद मानले. परंतु बाळापूर येथील अधिकारी यांना अजून पर्यंत जाग आलेली नाही. ही फार मोठी दुर्भाग्य आहे. फक्त सरकारचा पगार घेता मात्र नागरिकांच्या समस्यांकडे कोणतेच अधिकारी लक्ष देत नाही हि वास्तव परिस्थिती बाळापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची आहे.सर्व अधिकाऱ्यांना माहिती असुन सुध्दा आतापर्यंत पाणी टंचाई वरती उपाय योजना कोणत्याच केलेला नाहीत. यांना नागरिकांच्या जीवाचे काही देणे घेणे नाही हि खरी परिस्थिती आहे भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जर या उन्हात कोणाच्या जीवाचे बरेवाईट झाले याला जबाबदार अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील अधिकारी राहतील असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous articleईद-उल-अजहा नमाजेची घोषणा, बाळापूर ईदगाहमध्ये नमाज अदा