Home Breaking News बाळापूर बसस्थानकात  सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी

बाळापूर बसस्थानकात  सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी

श्याम बहुरूपे(तालुका प्रतिनिधी)

आज शिवसेनेच्या वतीने बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न प बाळापूर यांना निवेदन देण्यात आले मागील काळात एस . टी . कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे , बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी नव्हती . त्याकाळात काही लोकांनी बस स्थानक परिसर हे दारु पिण्याचा अड्डा बनवुन टाकला आहे . बसस्थानकावर पिण्याच्या झोपण्याचे सुध्दा प्रकार दारुड्यांकडून सुरु झाले आहेत . यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिला , मुली तसेच वृध्दांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . बसस्थानकातील बसण्याच्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी हि दारुडे मंडळी सर्रास दिवसा झोपा काढतात याचे फोटो सह पुरावे देण्यात आले . यामुळे महिला व मुली बस स्थानकात बसण्याची हिंम्मत करत नाहीत पर्यायाने त्यांना उन्हा तान्हात उभे राहून ताटकळत बसची प्रतिक्षा करावी लागते . दारुड्यांकडे दारू पिण्यासाठी पैसे नसले की , बाहेरगांवच्या थांबलेल्या प्रवाशांकडून जबरदस्तीने धाकदपट करुन पैसे उकळण्याचा प्रकार मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहेचं , शिवाय महिलांच्या दागिन्यांवर हात टाकण्याचे दोन – तिन प्रकार सुध्दा घडलेले आहेत . घडलेला प्रकार हा बाहेरगांवच्या महिला वा प्रवाशांसोबत झाल्यामुळे ते वेळेच्या अभावी पोलीस तक्रार देऊ शकत नाहीत . त्यामुळे या दारुड्यांवर कोणतीच पोलीस कारवाई न झाल्यामुळे यांचे दिवसेंदिवस त्यांचे मनोबल वाढत चालले आहे . या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी बस स्थानकात सि.सी.टी.व्ही कॅमेरे व खाजगी सुरुक्षा रक्षकाची नितांत गरज आहे . करीता उपरोक्त प्रकरणाची आपण गंभिरतेने दखल घेऊन , संबंधीत विभागामार्फत या ठिकाणी तात्काळ सि.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात यावे ची मागणी चे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले

यावेळी करणसिंह ठाकूर माजी न प उपध्यक्ष,शहरप्रमुख आनंद बनचरे,युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, राजुसिंह चव्हाण,भूषण गुजराथी,धरमसिंह ठाकूर,दिल्लू ठाकूर अनिल धानोकर,गणेश मुळे, ऋषिकेश लांडे,सत्यम जोध,अजयसिंह ठाकूर,शुभम सोनोने,प्रकाश मालोकर,उत्तमराव इंगळे,आदी शिवसैनिक उपस्थित होते

Previous articleपातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव
Next articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न