Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

रविवार दि.29 मे रोजी पंचवटी तील रामकुंडा समोरील अहिल्या हॉल येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीची पत्रकार परिषद संपन्न झाली.
या पत्रकार परिषदेला नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतेक वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी हजर होते. या प्रसंगी या सोहळया करीता नाशिकचे पालकमंत्री व राज्याचेअन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनरावजी भुजबळ, राज्याचे कृषी मंत्री मा. दादासाहेब भुशे, शिक्षण राज्यमंत्री मा. ओमप्रकाश ( बच्चु ) कडू हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती उपस्थित पत्रकाराना देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला दिगंबरभाऊ मोगरे ( मुख्यसंयोजक व शिवसेना महानगर संघटक ), समाधान बागल ( सह संयोजक व जिल्हा चिटणीस प्रहार जनपक्ष ) दत्तूभाऊ बोड़के ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार संघटना ) हेमंत शिंदे -( प्रसिद्धधी प्रमुख अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सार्वजनिक सोहळा व नाशिक जिल्हा संघटक ओबीसी महासभा)) मा. सुनिताताई मोड क ( कल्याणी संस्था अध्यक्ष )वैभव रोकडे ( मल्हार मा. अध्यक्ष ) श्याम गोसावी ( शहर प्रमुख प्रहार ) आदी. प्रमुख पदाधिकारी व समाज बांधवाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात येवुन जन्मोत्सव सोहाळा यशस्वी करण्याकरिता प्रसारमाध्यमानी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous articleबाळापूर बसस्थानकात  सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी
Next articleतालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही