Home Breaking News तालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही

तालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही

👉 सेवानिवृत्त पो.नि. भगवान कांबळे

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 31 मे 2022

हिमायतनगरचे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांचा शासकीय नियमानुसार सेवापुरती कार्यक्रम दिनांक – 30 मे रोजी हिमायतनगर पोलिस ठाण्यात अतिशय उत्साहाने पार पडला.
हिमायतनगर तालुक्यातील सर्व व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि हिमायतनगर शहरवासियांनी शाल, हार, नारळ, पुष्पगुच्छ देऊन कांबळे साहेबांचा सत्कार अनेकांनी केला. अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर प्रसिद्ध व्यापारी गौतम शेठजी पिंचा, गणेशराव शिंदे, मु.अ. सुर्यवंशी सर, नवनिर्वाचित पो.नि. चौधरी साहेब, कांबळे साहेबांचा सर्व परीवार या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृ.उ.बा.स.चे मा. संचालक शेख रफीक शेठ यांनी सर्वांना शास्ता पाण्यांची सोय केली होती.
अनेकांनी साहेबांचा स्वभाव, मनमोकळेपणा, सहकार्य, आपुलकी आदि मुद्दावर भाषणातुन प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, कर्मचारी, पत्रकार आदिनी आपली उपस्थिती आवर्जून लावली होती.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न
Next article” जगावेगळी ममता “