Home Breaking News सेवानिवृत शिक्षक कंञाटी निर्णय रद्द करुन, शिक्षक अभियोग्यता धारकांना तात्काळ रुजू करावे...

सेवानिवृत शिक्षक कंञाटी निर्णय रद्द करुन, शिक्षक अभियोग्यता धारकांना तात्काळ रुजू करावे —-सतिश गोपतवाड

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुलै 2023

हिमायतनगर
तालुक्यासह जिल्हयात, राज्यात जिल्हापरीषदेच्या, महानगर पालिकेच्या व अनुदानित/विनाअनुदानित संस्थेच्या शाळेत शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या ऊदात्त हेतुने शासनाच्या शालेय शिक्षण, क्रिडा विभागाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान आयोजन केलेले असुन 24 मार्च रोजी निकाल पण घोषित केला, निकाल घोषित करून तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटत असुन वित्त विभागाने रिक्त असलेल्या जागा भरण्याची परवानगी दिलेली असुन शासनाने अभियोग्यता धारकांना अद्यापही रुजू न करता सेवानिवृत झालेल्या शिक्षकांना तात्पुरती म्हणुन कंत्राटी बेसवर २० हजार रुपये मानधनावर घेण्याचा महाप्रतापी निर्णय लादून राज्यातील डि.एड,बीएड झालेले आणि शिक्षण पात्रता परीक्षा पास झालेल्या असंख्य अभियोग्यता धारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा चोळले आहे. शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा म्हणुन १७ जुलै रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्तालय कार्यालय व तर १९ जुलै रोजी मुंबई येथे लोकशाही मार्गे आंदोलनाचा ईशारा डी टी एड बी एड स्टुडंट असोशियशन सह विविध संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सेवानिवृत झालेल्या ७० वर्षापर्यतच्या शिक्षकाना कंत्राटी पध्दतीवर तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण, क्रिडा विभागाने ७ जुलै रोजी घेतला आहे. जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिका-याना नियुक्तीचे अधिकार दिल्याचे कळताच राज्यभरातील डिएड, बीएड झालेले आणि शिक्षक पात्रता परीक्षा ऊतीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यामधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे . शासनाने पुर्वीपासुनच वयाच्या ५८ व्या ६० व्या वर्षी वयोमाना नुसार सेवानिवृती दिली आहे. पुर्वी पासुन अशा वया पर्यत सेवानिवृती देण्याला ठोस असे धोरण असेलच ना. महाराष्ट राज्यात डिएड,बीएड,टिईटी झालेले हजारो विद्यार्थी बेकारीच्या खाईत लोटल्या गेल्याचे दिसते चित्र असताना शासनाने असे निर्णय घेऊन सुशिक्षीत बेकाराना कुठे नेऊन ठेवताय…. म्हणण्याची वेळ आल्याच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. डीएड, बीएड, टीईटी झालेल्या राज्यातील दोन लाख विद्यार्थ्याचा गांभीर्याने विचार शासनाने करावा म्हणुन शिक्षण आयुक्तालय पुणे येथे १७ जुलै तर मुंबई येथे डी टी एड बी एड संघटने सह विविध संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपोषणात सहभागी होण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील शिक्षक अभियोग्यता पाञता धारक शिक्षक सतिश गोपतवाड, शिवाजी माने, विजय वाठोरे, अनिल तालेवार, शेख सुलतान, उमेश माकोडे, अक्षय राठोड, अंकूश लकडे, अंकूश रामदिनवार योगेश शिंदे, महेश काळे, देवानंद गाडगेराव, सोनुताई गोपेवाड, शिवाणी राहुलवाड, मनोज देशमुख, श्रीनिवास सुर्यवंशी आदी पुणे, मुंबईला आंदोलनात सहभागी होत असल्याचे सतिश गोपतवाड यांनी सांगीतले आहे.

Previous articleकृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी  मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….
Next articleमराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील हडसणीकर यांना हिमायतनगर येथील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा…