Home Breaking News सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरुन डॉ प्रभाकर कवठेकर 30 जून रोजी होताहेत...

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरुन डॉ प्रभाकर कवठेकर 30 जून रोजी होताहेत सेवानिवृत्त

बीड, ( जिल्हा प्रतिनिधी):- पाटोदा तालुक्यातील पिट्टी येथील मुळचे रहिवासी असलेले व शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले बीड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्यात सेवेत असणारे डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे आपल्या पशूधन विकास अधिकारी पदावरुन तारीख ३० जून २०२२ गुरुवार रोजी सेवानिवृत्त होताहेत. बि व्ही एस सी ( व्हेटर्नरी) पशूधन विषयी त्यांचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात १९८७ ला ते सेवेत रुजू झाले.

त्यांनी अनेक ठिकाणी उत्कृष्ट रीत्या पशुसंवर्धन खात्यात सेवा बजावली. सांगेल त्या वेळी खेडोपाडी जावून शेतक-यांच्या जनावरांची (पशूधने) तपासणी करुन योग्य ते उपचार करुन वाखाणण्याजोगे अहोरात्र कार्य केले. त्यामुळे डॉ कवठेकर एक तत्पर पशूधन अधिकारी म्हणून सर्वदूर ठिकाणी अल्पावधीत परिचित होवून त्यांनी नावलौकिक मिळवला. यामुळे पशुसंवर्धन खात्यात अधिकारी असावा तर डॉ कवठेकर यांच्या सारखा, असी त्यांना ख्याती मिळाली.पशूधने ही शेतक-याची लक्ष्मी असतात. गाय, बैल यांच्या शिवाय शेती करणे शक्यच नाही. याचे महत्त्व समजून त्यांनी पशूधनाची सेवा केली.

याचे स्मरण आजही त्या भागातील शेतक-यात आहे. ते आता ३० जून २०२२ रोजी आपल्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने एकिकडे शेतकऱ्यांना गहिवरुन येत असतानाच दुसरीकडे शेतक-यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. शिवाय, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य सुखाचे जावे. असी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Previous articleलाईनमनच्या हलगर्जीपणास जनता वैतागली
Next articleशेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे