Home Breaking News डॉ. सौ. शारदा नितिश अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी सेवे करिता...

डॉ. सौ. शारदा नितिश अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी सेवे करिता नियुक्ती

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव:- खामगाव येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. सौ. शारदा नितीश अग्रवाल यांची सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र सामान्य रुग्णालय खामगाव चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेशजी टापरे यांनी दिले आहे.
डॉ. सौ शारदा अग्रवाल या एम. एस. गायनिक असून जोखीमीची प्रसूती, सोनोग्राफी, बिन टाक्याची शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढणे, वंध्यत्व निवारण, इत्यादी स्त्रीरोग उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे.
यापूर्वी त्यांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटल पुणे, फर्नांडिस हॉस्पिटल हैदराबाद, चिकित्सा सोनोग्राफी सेंटर मुंबई, इत्यादी ठिकाणी सेवा दिल्या आहेत.
डॉ. नितीश अग्रवाल प्रमाणेच खामगाव शहरातच राहून परिसरातील सामान्य गरजू रुग्णांची सेवा करण्याचा मानस यावेळी डॉ. सौ. शारदा अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleहिमायतनगर तालुक्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या 18 जिल्हा परिषद शाळा होणार बंद !
Next articleवाडी वस्ती तांड्यातील शाळा बंद करण्याचा हुकुमी निर्णय वापस घ्यावेत अन्यथा गोर सेनेकडून आक्रमक घेराव आंदोलन छेडणार