Home Breaking News अखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.

अखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.

परभणी, (आनंद ढोणे):- पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर काटेरी वेड्या बाभळी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. याविषयी, साप्ताहिक भुमिराजा न्यूज पोर्टल वर “काटेरी वेड्या बाभळींनी घेरले पांगरा-पूर्णा रस्त्याला” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमी वाचवून त्या बातमीची व ह्या समस्येची दख्खल घेत जिल्हा परिषद परभणी व प्रधानमंत्री सडक रस्ता योजना कामाचा अभियंता दिपक भाऊ कुलकर्णी यांनी सबंधित वरिष्ठ अधिकारी यांना कळवून काटेरी बाभळा तोडण्याची व्यवस्था केली.यावरुन गॅंगमेन मजूराकरवी सदर काट्या तोडण्यात आल्या आहेत. याकामी भुमिराजा न्यूज पोर्टलचे नागरीक आभार मानत आहेत.

Previous articleजिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !
Next articleपांगरा येथे सभामंडप बांधकामासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून १० लाख रुपये निधी  मंजुर