Home Breaking News तालुका प्रशासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमास शेतकरी रवाना.

तालुका प्रशासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमास शेतकरी रवाना.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 25 जुन 2023

हिमायतनगर तालुक्यातुन मौजे पोटा बु. येथील कृषि आणी महसुल विभाच्या वतीने नांदेड येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमास हिमायतनगर तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा शेतकरी सहलीचे नोडल अधिकारी एम. एस. आडे यांच्या नेतृत्वाखाली ही बस रवाना झाली आहे. शेतकऱ्यांच्या सतत सेवेत नेहमीच मार्गदर्शन करणारे आडे यांनी आमच्या प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवर बोलतांना सांगितले. आपल्या हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी कृषि विभागाच्या कृषिविषयक योजना, कार्यक्रम, सहल, राज्य अंतर्गत अभ्यास दौरा या उपक्रमाअंतर्गत नेहमीच सक्रीय सहभाग हा शेतकरी नेहमीच घेत आहेत. यांचे सर्व श्रेय मा. हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनाच जाते. हे कधीच नाकारता येत नाही.
त्यांच्यासोबत या दो-या दरम्यान महसुल व कृषि विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि पोटा बु. येथील शेतकरी बसमध्ये उपस्थित होते.

Previous articleकृषि सहाय्यक नसल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनचा अभाव.
Next articleजलंब शिवारामधे शेतामधील थिबक चे बंडल चोरी..